You are currently viewing केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या प्रचारासाठी भाजपाचे स्टार प्रचारक कोकण दौऱ्यावर

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या प्रचारासाठी भाजपाचे स्टार प्रचारक कोकण दौऱ्यावर

कणकवली :

 

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजपाचे देशभरातील स्टार प्रचारक रत्नागिरी सिंधुदुर्गात जाहीर प्रचार सभा घेणार आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ राजापुरात राजीव गांधी मैदानात 26 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता धडाडणार आहे. उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची 1 मे रोजी कुडाळ मध्ये सभा घेणार असून 3 मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तोफ धडाडणार आहे. या सभांची जय्यत तयारी महायुतीकडून सुरू आहे असे असे उद्गार माजी आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत काढले.

प्रतिक्रिया व्यक्त करा