You are currently viewing पद्मश्री मधु मंगेश कर्णिक ग्रंथालय करुळ येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

पद्मश्री मधु मंगेश कर्णिक ग्रंथालय करुळ येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

तळेरे:

मराठी भाषेच्या समृद्धीसाठी ज्या साहित्यिकांनी संत महात्मांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं. त्यांचे ऋण व्यक्त करण्यास शब्दही अपुरे पडतात .यानिमित्ताने ग्रंथालयात विविध विषयावरील पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रंथालयाचे सचिव श्री.नारकर सर यांच्या हस्ते करण्यात आले.मराठी भाषा ही आपली माता आहे तिच्या उद्धारासाठी आपण डोळ्यात अंजन घालून प्रयत्न केले पाहिजे असे मत ग्रंथालयाचे कार्यकारिणी मंडळातील सदस्य सौ.रूचिका गोसावी यांनी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. ग्रंथालयाचे लिपिक कु.कोमल विलास सामंत यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा उद्देश स्पष्ट केला.सूत्रसंचालन ग्रंथपाल कु.रुपाली दिपक शेटये यांनी केले. या निमित्ताने नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करुळ या प्रशालेयाचे कर्मचारी श्री.विनोद मेस्त्री, नीलेश फोंडेकर व विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा