You are currently viewing १८ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ल्यात श्री सातेरी देवीचा वार्षिक जत्रोत्सव

१८ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ल्यात श्री सातेरी देवीचा वार्षिक जत्रोत्सव

वेंगुर्लेची ग्रामदेवता श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव त्रिपुरारी पौर्णिमेला गुरुवार, १८ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ८ वा. श्री देवी सातेरीचे पाद्यपूजन, सकाळी ९ वा. पालखीचे आगमन, रात्रौ ११ वा. श्री देव रामेश्वर पालखी भेट, तरंगदेवता, श्री देव रामेश्वर व श्री देवी सातेरी यांच्या पालखीसह मंदिर प्रदक्षिणा, त्यानंतर रात्रौ श्री पार्सेकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.

उत्सवानिमित्त पुष्पपूजा, मंदिरात खास फुलांची आकर्षक सजावट व संपूर्ण मंदिरास नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. भाविकांनी दर्शनाचा व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त मंडळ श्री देवी सातेरी देवस्थान वेंगुर्ले यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा