You are currently viewing माजगावात स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

माजगावात स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

माजगावात स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

सरपंच सौ. अर्चना सावंत यांचा पुढाकार: ज्येष्ठ नागरिक दिन साजरा..

सावंतवाडी

स्वच्छता ही सेवा अंतर्गत माजगाव ग्रामपंचायत येथे आज स्वच्छता अभियान उपक्रम राबवण्यात आला. यावेळी सरपंच डाॅ. सौ अर्चना सावंत यांच्या पुढाकारातून हा अभियान राबवण्यात आला.या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान यावेळी जेष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला.

यावेळी या कार्यक्रमासाठी सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. व्ही. एम नाईक साहेब , सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती श्री. अशोक दळवी, सरपंच श्रीम. अर्चना सावंत, ग्रामपंचायत सदस्य श्री. संजय कानसे, ज्ञानेश्वर सावंत, श्रीम. मधू कुंभार, श्रीम. गीता कासार, श्रीम. उर्मिला मोर्ये, श्रीम.माधवी भोगण, श्रीम. प्रज्ञा भोगण, श्रीम.विशाखा जाधव आदि सदस्य तसेच देवस्थान कमिटीचे अध्यक्ष श्री. आनंद सावंत, गावचे प्रमुख श्री. आर.के. सावंत, नारायण सावंत गुरुजी, भालेकर गुरुजी, व माजगाव गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी आपले विचार मांडले सदर कार्यक्रमात गटविकास अधिकारी यांनी जेष्ठ नागरिकांना स्वच्छते संदर्भात व त्यांच्या आरोग्य संदर्भात मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमांसाठी क्षेत्रीय अधिकारी श्री कमलाकर ठाकूर यांनी मोलाचं सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − five =