You are currently viewing महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन

सावंतवाडी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मानीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सावंतवाडी तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष श्री गुरुदास गवंडे यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी प्रसूती माताना बिस्किट वाटप कार्यक्रम करण्यात आला यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्री संदीप सावंत हेही उपस्थित होते.

त्याचप्रमाणे सावंतवाडी तालुक्यातील ३४८ खेड्यांचा अधिपती श्री देव उपरलकर चरणी राज साहेबांना दीर्घायुष्य लाभो व त्यांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडो यासाठी श्री देव उपरलकर चरणी प्रार्थना करण्यात आली व सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जयंत जावडेकर व त्यांच्या कर्मचारी यांच्या मुळेच सावंतवाडी नगरपरिषदेला वसुंधरा पुरस्कार प्राप्त झाला त्याबद्दलही त्यांचे मनसेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, माजी उपजिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, परिवहन जिल्हाध्यक्ष ॲड राजू कासकर, उपतालुकाअध्यक्ष सुधीर राऊळ, र्वेले शाखाध्यक्ष संतोष सावंत, चराठा शाखाध्यक्ष चंद्रकांत परब, माजी उपशहरअध्यक्ष अभिमन्यू गावडे, विलवडे शाखाध्यक्ष श्रीराम सावंत, परिवहन सेनेचे कार्याध्यक्ष महेश बांदिवडेकर, गजानन डेगवेकर, प्रवीण गवस, सुरज सावंत आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − 1 =