युवा नेते विशालभाई परब पुरस्कृत लक्ष्मी आधार उद्योजिका मेळावा महोत्सवातील रील्स स्पर्धेचा निकाल जाहीर
वेंगुर्ला : महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याबरोबरच स्थानिक कलागुणांना आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला आणि लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लक्ष्मी आधार उद्योजिका मेळावा महोत्सव २०२६’ अंतर्गत युवा नेते विशालभाई परब पुरस्कृत रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून वासुदेव खडपकर यांनी प्रथम क्रमांकाचे ५ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले.
स्पर्धेत दत्तराज कामतेकर यांनी द्वितीय क्रमांकाचे ३ हजार रुपयांचे, तर अनंत गावडे (मालवणी आबा) यांनी तृतीय क्रमांकाचे २ हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले. उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकाचे १ हजार रुपयांचे पारितोषिक तुषार रेडकर यांनी, तर उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांकाचे १ हजार रुपयांचे पारितोषिक दिव्या बागायतकर यांनी पटकावले.
सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे साधन न राहता कला, विचार, कौशल्य आणि कल्पकता व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम बनले आहे. याच पार्श्वभूमीवर या रील्स स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धकांना आपली सर्जनशीलता सादर करण्याची संधी देण्यात आली. विविध विषयांवरील आशयपूर्ण आणि कल्पक सादरीकरणातून स्पर्धकांनी आपल्या कलागुणांची झलक दाखविली.
‘लक्ष्मी आधार उद्योजिका मेळावा महोत्सव २०२६’मधील या उपक्रमाला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उद्योजकता, कला आणि डिजिटल माध्यमांचा सकारात्मक वापर यांची सांगड घालणारा हा उपक्रम विशेष आकर्षण ठरला. स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे आयोजक संस्थांच्या वतीने अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. ज्योती देसाई, सचिव सौ. वृंदा गवंडळकर, खजिनदार डॉ. दिपाली देसाई, सदस्य सौ. शुभदा नवार, सौ. आकांक्षा परब, काजल गिरप व दिपाली अभ्यंकर उपस्थित होत्या.
तसेच इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लाच्या सचिव सौ. श्रीया परब, उपाध्यक्षा सौ. सई चव्हाण, एडिटर सौ. आरती गिरप, सदस्य सौ. रसिका मठकर, ॲड. अनुराधा वेर्णेकर, सौ. वैभवी दाभोलकर व सौ. हर्षदा शिरसाट यांची उपस्थिती होती.
दोन्ही संस्थांच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित या उपक्रमामुळे स्थानिक स्तरावरील कलागुणांना प्रोत्साहन मिळाले असून, समाजातील विविध घटकांना आपले कौशल्य आणि सर्जनशीलता प्रदर्शित करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले.
