You are currently viewing महिला दिनानिमित्त ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम…

महिला दिनानिमित्त ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम…

मालवण पंचायत समितीचे आयोजन ; झुंबा डान्स, वेशभूषा स्पर्धेचेही आयोजन…

मालवण

पंचायत समितीच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ८ रोजी कोरोनाचे नियम पाळून खेळ पैठणीचा यासह अन्य विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
यात दिवसभर महिला कर्मचारी, पदाधिकारी यांच्यासाठी विविध कार्यक्रम तसेच प्रशिक्षण
वेशभूषा स्पर्धा, झुंबा डान्स प्रशिक्षण, आहार संदर्भात प्रशिक्षण तसेच महिला कर्मचाऱ्यांसाठी एक दिवस विना कामकाजाचा अशी संकल्पना कार्यक्रम आहेत. या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, महिला बालविकास अधिकारी कौमुदी रसाळ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − seventeen =