You are currently viewing फोंडाघाट येथे सिंधुदुर्ग सिंधुरत्न समृद्ध योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी संशोधन केंद्र येथे प्रशिक्षणाचे आयोजन !

फोंडाघाट येथे सिंधुदुर्ग सिंधुरत्न समृद्ध योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी संशोधन केंद्र येथे प्रशिक्षणाचे आयोजन !

फोंडाघाट येथे सिंधुदुर्ग सिंधुरत्न समृद्ध योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी संशोधन केंद्र येथे प्रशिक्षणाचे आयोजन !

कणकवली

कोकणामध्ये भात पिकाखालील क्षेत्र जवळपास 4.50 लाख हेक्टर वरून मागील काळात 3.79 लक्ष हेक्टर पर्यंत खाली आले आहे. तथापि शेती कामासाठी मजुरांचा तुटवडा व यांत्रिकीकरणाच्या अभावामुळे यात आणखीन घट होण्याची शक्यता आहे. या बाबींचा विचार करून डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ- दापोली यांच्या वतीने सिंधुरत्न समृद्ध योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अन्नसुरक्षा दल (फूड सिक्युरिटी आर्मी) व यांत्रिकरणासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना यांत्रिक पद्धतीने शेती करता यावी याकरिता कृषी संशोधन केंद्र-फोंडाघाट व फळ संशोधन केंद्र -वेंगुर्ला या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी भात, आंबा, काजू, मसाला पिके इत्यादी पिकांच्या यांत्रिकीकरणाविषयी ६ दिवसांची प्रशिक्षणे आयोजित केली जाणार आहेत.

या प्रशिक्षणामध्ये पॉवर टिलर ,भात लावणी यंत्र, भात कापणी यंत्र,भात मळणी यंत्र ,ग्रास कटर, चेंन स्वा,नारळ चढणी शिडी,इत्यादी यंत्रांची हाताळणी व देखभाल संबंधी प्रशिक्षण देण्यात येईल. सदर प्रशिक्षणे मोफत असून प्रशिक्षणार्थींच्या चहा,नाश्ता ,जेवणाचा खर्च केला जाईल.तसेच सहभागी प्रशिक्षणार्थींना रुपये 500 प्रतिदिन प्रमाणे मानधन दिले जाईल.प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सिंधूरत्न समृद्ध योजनेमार्फत यंत्रे खरेदी करिता अनुदान दिले जाईल.तरी सर्व तरुण शेतकरी मित्रांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी वेळीच नोंदणी करून आपला सहभाग नोंदवावा व संधीचा फायदा घ्यावा. नाव नोंदणी करता संपर्क डॉक्टर व्ही एन शेटे (74 99 57 34 37 ),डॉक्टर बी एस देसाई (94036 41 11 6) डॉक्टर डी डी पाटील (99 70 55 29 80) श्री सावंत (83 29 68 26 95)

प्रतिक्रिया व्यक्त करा