अत्यंत साध्या पद्धतीत नवरात्र उत्सवाला बावमध्ये सुरुवात….

अत्यंत साध्या पद्धतीत नवरात्र उत्सवाला बावमध्ये सुरुवात….

कुडाळ

कुडाळ तालुक्यातील बाव या गावी नवरात्री उत्सव प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पणे पालन करून सुरवात करण्यात आला. या ठिकाणी श्री देव गवळदेव मंदिरात दरवर्षी नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ग्रामस्थांची भजने, गरबा रास, दांडिया असे कार्यक्रम असतात पण यंदा कोरोना महामारी मुळे श्री गवळदेव मित्र मंडळाने अगदी साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला मंडळाचे पदाधिकारी नागेश परब (सरपंच बाव )सचिव राजेंद्र परब, यांनी अतिशय सुंदर असे कार्यक्रमाचे नियोजन केले होते. शासनाच्या नियमात कार्यक्रम सदर करणे. आणि तेही काटेकोर पण नियम पाळणे सर्वाना बंधनकारक आहे. फक्त रात्री 9/00ते 10या वेळेत भजन सादर करून नंतर श्रींचा प्रसाद. , कोणताही गोंधळ नाही, मास्क लावूनच मंदिरात प्रवेश, गर्दी न करता श्रींचे दर्शन घेणे, असे नियम ठेऊन सदर कार्यक्रमास सुरुवात झाली. आमच्या संवाद मिडिया च्या प्रतिनिधी शी बोलताना ते म्हणाले कि आह्मी दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करतो पण ह्या कोरोना मुळे मनासारखा उत्सव साजरा करता येत नाही. शेवटी मंडळाचे सचिव यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा