You are currently viewing महाराष्ट्र ब्राम्हण मंडळ मालवण शाखेचा स्नेहमेळावा उत्साहात…

महाराष्ट्र ब्राम्हण मंडळ मालवण शाखेचा स्नेहमेळावा उत्साहात…

मालवण

महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदुर्ग शाखा मालवणचा स्नेहमेळावा नांदोस कट्टा येथील विनोद अशोक गगनग्रास यांच्या घरी आशिष आपटे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला.
श्री गणेश पूजन, श्री परशुराम महाराज स्मरण, गोपूजन विधीने कार्यक्रमास सुरवात झाली. यावेळी एकूण ५२ बांधव उपस्थित होते. यजमानपद स्वप्निल आपटे तसेच पौरोहित्य मंदार सरजोशी यांनी सांभाळले. संमेलनाचे दीपप्रज्वलन भालचंद्र केळकर, आशिष आपटे, मंदार सरजोशी यांच्या हस्ते करण्यात आले. सामूहिकरित्या श्री अथर्वशीर्ष पठण करण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शक श्रीकृष्ण वझे व मेघना जोशी यांनी ब्राह्मण ज्ञातीला आचार, विचार, संस्कार, धार्मिक दृष्टिकोन याबद्दल मार्गदर्शन केले.

निलेश सरजोशी तसेच श्रीमती अर्चना हर्डीकर व श्रीपाद गिरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आनंद आपटे यांनी मधमाश्यांचे संरक्षण व संवर्धन याबाबत माहिती दिली. त्याच बरोबर विविध वृक्ष वाटप केले. श्रीमती अर्चना हर्डीकर यांनी जिल्हा संमेलनाविषयी माहिती दिली व आभार मानले. पुढील तालुका संमेलन मसुरा विभागात होणार असल्यामुळे मसुरा विभाग अध्यक्ष मिलिंद कुंटे यांनी स्वप्निल आपटे यांच्या हस्ते संमेलनाचा नारळ स्वीकारला. भोजन व्यवस्था प्रसाद नातू यांनी बजावली. सूत्रसंचालन व प्रास्ताविक उदय मेहंदळे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा