You are currently viewing शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दाखल्यासाठी सोमवारपासून सुरु होणार युवासेना दोडामार्ग मार्फत मदत केंद्र

शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दाखल्यासाठी सोमवारपासून सुरु होणार युवासेना दोडामार्ग मार्फत मदत केंद्र

युवासेना तालुका प्रमुख मदन राणे यांनी केले परिसरातील विद्यार्थांना लाभ घेण्याचे आवाहन

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यातील विद्यार्थी तसेच इतर नागरीकांना लागणारी आवश्यक कागदपत्रे लवकर मिळत नाहीत.कागदपत्रांची पुर्तता करताना विद्यार्थांची धावाधाव होते.यावर उपाययोजना करणे आवश्यक असल्यास एकाच दिवशी सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांना एकत्र आणून केम्प भरवुन एकाच ठिकाणी दाखले देण्यात यावे अशी मागणी तहसीलदार अरूण खानोलकर यांच्याकडे करण्यात आली होती.त्याची सुरुवात येत्या सोमवारपासून लक्ष्मी गिरीजा ऑनलाईन सेंटर बॅक ऑफ इंडिया शाखेजवळ होत असल्याने परिसरातील सर्व विद्यार्थी तसेच नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − one =