You are currently viewing कोलगाव सोसायटी चेअरमनपदी भाजपाचे वीरेंद्र धुरी तर व्हाईस चेअरमनपदी शिवसेनेचे थॉमस डिसोजा

कोलगाव सोसायटी चेअरमनपदी भाजपाचे वीरेंद्र धुरी तर व्हाईस चेअरमनपदी शिवसेनेचे थॉमस डिसोजा

सावंतवाडी

कोलगाव सोसायटीच्या चेअरमनपदी भाजपाचे वीरेंद्र देऊ धुरी तर व्हाईस चेअरमनपदी शिवसेनेचे थॉमस फ्रान्सिस डिसोजा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित संचालकांच्या खास बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून श्रीम यादव उपस्थित होत्या. या सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध करण्यात आली होती. यात भाजपाचे आठ संचालक तर शिवसेनेचे पाच संचालक आहेत.

यावेळी सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक जयानंद प्रभाकर म्हापसेकर, लक्ष्मण मधुकर राऊळ, प्रभाकर रघुनाथ राऊळ, रवींद्रनाथ बाबाजी राऊळ, महेश रमेश सारंग, सलमा बेगमशफी अहमद शेख, धाकू बाबू पाटील, बाबुराव गोविंद चव्हाण, मेघश्याम बाळकृष्‍ण काजरेकर, पुंडलिक सहदेव राऊळ, शुभांगी शिवराम घोगळे उपस्थित होते.

यावेळी नवनिर्वाचित चेअरमन वीरेंद्र धुरी आणि व्हाईस चेअरमन थॉमस डिसोजा यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून विविध कृषि व फलोत्पादन योजनांचा लाभ गावातील शेतकरी व लघु उद्योजकांना देण्यात येणार असून महिलावर्गालाही रोजगारासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा