कणकवलीत भाजपाच्यावतीने मंदिरे खुली करण्यासाठी घंटानाद आंदोलन……

कणकवलीत भाजपाच्यावतीने मंदिरे खुली करण्यासाठी घंटानाद आंदोलन……

मारुती मंदिरात आरती करत छेडले आंदोलन….

दार उघड उद्धवा दार उघडचा गजर….

भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात मंदिरे दर्शनासाठी खुले करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली होती. राज्य सरकारने अद्यापही कोणताही निर्णय घेतला नाही, त्याविरोधात शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. कणकवली मारुती मंदिर येते भाजपा कार्यकर्त्यांनी घंटा वाजवत आंदोलन छेडत राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला.

यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेवक विराज भोसले, शिशिर परुळेकर, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, निखिल आचरेकर, किशोर राणे, बबलू सावंत, गीतांजली कामत, गणेश तळगावकर आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मारुती मंदिरात आरती व घंटानाद आंदोलन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा