You are currently viewing दहिहंडी गोविंदाला मिळाला न्याय

दहिहंडी गोविंदाला मिळाला न्याय

*भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख*

*दहिहंडी गोविंदाला मिळाला न्याय*
गोविंदा गोपाला अनेक नावानं आपण नटखट कृष्णाची स्तुती करत असतो . अनेक कृष्ण लिला पैकी दहिहंडी हि सुध्दा एक कृष्ण लिलाच आहे . आज आपणही सर्वत्र गोकुळाष्टमी दिवशी दहिहंडी फोडण्याचा कार्यक्रम आयोजित करतो. यावेळी आपल्या जीवाची पर्वा न करता काही गोविंदा उंच उंच स्तर लावून अगदी पणाने ती उंच असणारी दहिहंडी फोडण्याचा प्रयत्न करत असतात यातच काही गोविंदा यावेळी होणा-या मानवी मनोरे यामध्ये वारंवार अपघात होतात यावेळी काही गोविंदा जखमी होतात तर काही गोविंदाचा मृत्यू सुध्दा होतो .
दिनांक २४ ऑगस्ट २०१६ रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र विकाक- २८१५/ प्र क्र ०८/ क्रीयोसो-१ नुसार अशा दहिहंडी काळात मानवी मनोरे रचताना दुर्घटना ग्रस्त झालेल्या गोविंदांना आर्थिक सहहय करण्याची बाब विचाराधीन होती पण आजपर्यंत कधीही कोणत्याही गोविंदाला आर्थिक संरक्षण मिळाले नाही मग शासनाने नव्याने १७ ऑगस्ट २०२२ रोजी संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांनी दहिहंडी उत्सवादरम्यान होणा-या अपघातांची दखल घेऊन नवीन शासन निर्णय आर्थिक मदत देण्यासाठी जाहीर केला
राज्यात दरवर्षी दहिहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येतात त्यामध्ये गावातील परगावाहून. परजिल्ह्यातील. परराज्यातील. दहिहंडी प्रेमी भाग घेतात . दहिहंडी उत्सव साजरा करताना मानवी मनोरे रचताना धोका असल्याचे निरीक्षण. न्यायालय. प्रशासन. व अन्य संस्थांनी वारंवार केले आहे.मात्र दहिहंडी उत्सव साजरा करताना परंपरा जपणे हे महत्वाचे असल्याने अनेक गोविंदा पथक त्यामध्ये सहभागी होतात. दहिहंडी उत्सवात सहभागी होऊन मानवी मनोरे रचताना बर्याच वेळा अपघात/ दुर्घटना होतात ‌काही वेळा पथकातील गोविंदाचा मृत्यू अथवा गंभीर दुखापत होऊन जीवाला धोका निर्माण होतो.परिणामी या गोविंदाच्या कुटुंबाला उर्वरित जीवन आर्थिक विवंचनेत व्यतीत करावे लागते.या अनुषंगाने राज्यात दहिहंडी उत्सवात भाग घेऊन मानवी मनोरे रचणा-या गोविंदाचा विमा उतरवून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी व त्यासाठी शासनाकडून विमा हप्ता भरण्याची योजना विहित करण्याची बाब शासन स्तरावरून तपासण्यात येत आहे.दहिहंडी उत्सव नजीक असल्याने सदर योजना विहित करण्याच्या कार्यवाही साठी अतिशय कमी कालावधी आहे. त्यामुळे सन २०२२ रोजी होणा-या दहिहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना गोविंदा अपघात दुर्घटना झाल्यास त्यांना आर्थिक संरक्षण देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे आणि होती.
राज्यात सन २०२२ मध्ये दिनांक १९ ऑगस्ट २०२२ रोजी आयोजित करण्यात येणार्या दहिहंडी उत्सवा मध्ये सहभागी गोविंदा पथकाकडून मानवी उंच मनोरे रचताना अपघात झाल्यास व त्यामध्ये गोविंदा अपघातात गंभीर जखमी किंवा मृत झाल्यास किंवा त्याचा कोणताही अवयव निकामी झाल्यास अशा गोविंदाच्या पालकांना कुटुंबियांना कायदेशीर वारसास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून काही अटि शर्ती वर आर्थिक सहाय्य देण्यास शासनाची मान्यता आहे.
गोविंदा पथकातील खेळाडू प्रत्यक्ष दहिहंडी थरावरून/ मानवी मनोरे वरुन पडल्याने मृत्यू पावल्यास त्या खेळाडूंच्या कायदेशीर वारसास रूपये १० लाख अर्थ सहाय्य अनुज्ञेय राहील
गोविंदा पथकातील खेळाडू प्रत्यक्ष दहिहंडी थरावरून मानवी मनोरे वरून पडल्याने त्याचे दोन डोळे किंवा दोन हात किंवा दोन पाय किंवा कोणताही महत्वाचा अवयव निकामी झाल्यास ७ लाख ५० हजार इतके आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहील
गोविंदा पथकातील सहभागी खेळाडू प्रत्यक्ष दहिहंडी थरावरून मानवी मनोरे वरून पडल्याने त्याचा एक डोळा. एक हात. एक पाय. अथवा कोणताही महत्वाचा अवयव निकामी झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास रुपये ५ लाख इतके आर्थिक अनुज्ञेय राहील
हा आदेश शासनाने केवळ एका वर्षासाठी कार्यान्वित ठेवला आहे ‌दहिहंडी उत्सवात सहभागी होणा-या गोविंदांचा विमा उतरविणे याबाबत शासन स्वतंत्र पणे घेण्यात आला येईल.
दहिहंडी उत्सवात सहभागी गोविंदांना वरिल प्रमाणे आर्थिक सहहय करण्यासंदर्भात अटि व शर्ती या खालील प्रमाणे देण्यात आल्या आहेत त्यांचे काटेकोरपणे पालन करणे हे प्रथम काम दहिहंडी उत्सव आयोजक समितीवर आहे.
महाराष्ट्र राज्यात आयोजित करण्यात येणार्या दहिहंडी उत्सवामध्ये प्रतक्ष सहभागी असलेल्या अपघातग्रस्त गोविंदांना सदर आर्थिक सहहय अनुज्ञेय राहील
दहिहंडी उत्सवांचे आयोजन करणारे आयोजक यांनी स्थानिक प्रशासन तसेच अन्य आवश्यक परवानग्या घेणे आवश्यक आहे
दहिहंडी आयोजना संदर्भात मा न्यायालय . प्रशासन यंत्रणा. यांचेकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना/ आदेश यांचें आयोजक संस्था तसेच सहभागी गोविंदा पथक यांनी पालन केले असणे आवश्यक आहे
दहिहंडी उत्सवात सहभागी गोविंदा यांनी मानवी मनोरे तयार करण्याचे औपचारिक अथवा अनौपचारिक प्रशिक्षण घेतले असल्याचे आयोजकांनी खात्री करून घ्यावी
सदर उत्सव आयोजित करणार्या संस्थेने सहभागी गोविंदाच्या सुरक्षेची काळजी घेणा-या उपाययोजना केलेल्या असाव्यात
दहिहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना अपघात होऊन मृत्यू अथवा गोविंदांना दुखापत झाल्यास सदर सहहय अनुज्ञेय आहे. अन्य कोणत्याही कारणानें अपघात अथवा दुर्घटना झाल्यास सदर आर्थिक सहहय अनुज्ञेय राहणार नाही.
दहिहंडी उत्सवामध्ये सहभागी होणारें गोविंदा यांनी शासन निर्णय महिला व बाल विकास विभाग दिनांक २४/ ऑगस्ट २०१६ नुसार विहित केलेल्या वयोमर्यादा पालन करणे बंधनकारक आहे. सबब १८ वर्षांपेक्षा गोविंदाचे वय कमी नसावे अन्यथा सदर आर्थिक सहहय अनुज्ञेय राहणार नाही.
दहिहंडी उत्सवात मानवी मनोरे रचताना अपघात दुर्घटना झाल्यास तात्काळ वैद्यकीय मदत उभी करणे दहिहंडी उत्सव आयोजक यांच्यावर बंधन राहील. आयोजकांनी स्थानिक प्रशासनाच्या सहहयाने आवश्यक ती कार्यवाही करावी.
‌ दहिहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रचताना अपघात झाल्यास त्या अपघाता बाबत आयोजकांनी तात्काळ स्थानिक प्रशासन तसेच स़बधित पोलिस यंत्रणा यांच्याकडे तात्काळ अहवाल सादर करणे आवश्यक राहील.
आपल्यासाठी आपले आई वडील बहीण भाऊ पत्नी वाट पाहत आहेत. कोणतंही काम करा आपला आणि आपल्यावर जीवापाड प्रेम करणारे यांच भान ठेवा पैसा आपला जीव परत आणत नाही .
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
9890825859

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − three =