You are currently viewing नैवेद्य,प्रसाद व आहार

नैवेद्य,प्रसाद व आहार

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनघा कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

*नैवेद्य,प्रसाद व आहार*

आपल्या संस्कृतीत प्रसाद व नैवेद्याला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक सणाला आपल्याकडे नैवेद्य व प्रसाद असतोच.मोठा सण किंवा उत्सव असेल तर महाप्रसाद असतो. भोजनाच्या पानाभोवती आपण पाणी फिरवून घेतो कारण त्यामुळे ते भोजन प्रसाद बनते आणि आपण श्रद्धेने ते सेवन करतो. प्रसाद हा नेहमीच सावकाश व जठराग्नीला शांत करण्यापुरताच स्वीकारावा.
आपल्या आहाराचहि तसंच आहे.गीतेमधे भगवंत म्हणतात,”आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवती प्रिय:” प्रत्येक व्यक्तीला आवडणारा आहारही प्रकृतीच्या त्रिगुणांनुसार तीन प्रकारचा असतो. सत्वगुणी मनुष्यांना जीवन शुद्धी करणारा आहार प्रिय आहे. रसयुक्त स्निग्ध पौष्टिक असा संतुष्ट करणारा आहार बल,आरोग्य व सुख प्रदान करतो.”रस्या: स्निग्धा: स्थिरा ह्रद्या आहारा: सात्विकप्रिया:” रजोगुणी मनुष्यांना कडू, तिखट, खारट,आंबट व शुष्क आहार प्रिय असतो पण असा आहार व्याधी निर्माण करणारा आहे तर तमोगुणी लोकांना आधी शिजवलेले व अपवित्र पदार्थांनी युक्त असे अन्न प्रिय असते पण अन्नाचा एकमेव उद्देश आयुष्य वृद्धी करणे, मन: शुद्धी करणे आणि बलो वृद्धि करणे हा आहे. प्राचीन काळी महान ऋषींनी आरोग्यवर्धक व दीर्घायु देणाऱ्या अन्नाची निवड केली. दूध हे सर्व अन्नपदार्थां पैकी अत्यंत पौष्टिक आहे.दुग्धपदार्थांपासून सिग्धता प्राप्त होते. भगवद्गीतेत भगवंत सांगतात कि ते भाजीपाला धान्य व दुधापासून बनवलेले पदार्थ भक्तीभावाने अर्पण केल्यास स्वीकारतात म्हणून सर्वोत्तम भोजन म्हणजे भगवद्प्रसाद होय. कारण असा अन्नरुपी प्रसाद हा दिव्य असतो म्हणून अन्नाला निर्जंतुक व खाण्यास योग्य आणि रूचकर बनवण्यासाठी ते भगवंतांना अर्पण केले पाहिजे.
तसेच आपण नवरात्रीच्या आरतीत म्हणतो”नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणे हो——षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्पियली हो——–” अर्थात नवमीचे दिवशी नवदिवसांच्या पारण्याला ज्या भोजनाचा नैवेद्य आपण भगवंताला अर्पण करतो तो षड्रस असावा (कडू,गोड,आंबट,तिखट,खारट,तुरट) एकंदरीत काय तर सर्व रस पोटात जावेत. ऋतुमानानुसार जे जे नैवेद्य व प्रसाद आपण आपल्या सणांच्या दिवशी भगवंताला अर्पण करतो ते ते सर्व आपल्या निरोगी व दीर्घायू आरोग्यासाठी उत्तम आहेत मग गुढीपाडव्याची कडूलिंब व गुळाची चटणी असो,संक्रातीचा तिळगुळ असो जो हृदयासाठी फायदेशीर आहे किंवा हनुमानाचा प्रसाद गुळ व दाणे जे शक्तिवर्धक आहे, गुळ व फुटाणे,बालाजीचा प्रसाद जे रक्तशुध्दकारक आहे, गुळ खोबरे जे बुद्धिवर्धक आहे तसेच पंचामृत किंवा पायस असो खडीसाखर असो हे सर्व प्रसाद (तसे बरेच आहेत) प्रमाणांत सेवन केल्यास उतारवयातही आपले आरोग्य सुदृढ व निरोगी राखतील यात शंका नाही.
आपल्या आयुष्याचा पेला ही अशाच कडू-गोड प्रसंगांनी भरलेला आहे. ते सर्व प्रसंग किंवा अनुभव पचवायची ताकद भगवंत त्याच्या नैवेद्य व प्रसादातून आपल्याला नक्कीच प्रदान करतो नाही का?

सौ.अनघा कुळकर्णी.
पुणे.९३२३४९१११३
🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷

*ऑफर… ऑफर….. ऑफर….💃💃*

*_कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी पार्क गृह प्रकल्पात ग्राहकांना मिळणार ” ऑफर”…_*

*_१६ लाखात १ बीएचके, तर २७ लाखात २ बीएचके फ्लॅट; दुकान गाळा फक्त १० लाखात…_*
ऑफर*

*🥳पुन्हा एकदा कुडाळ शहरात १६ लाखात फ्लॅट घेण्याची संधी…!💃*

*_🥰आता आमची नवी ओळख “छत्रपती शिवाजी पार्क”…🥰_*

*ग्राहकांच्या उत्स्फूर्त😍 प्रतिसादानंतर आम्ही घेऊन आलो🤩 आहोत…! खास *दसरा🎊 ऑफर…!😍🥳💃*

*मंदी नही…! 😍ये संधी है…!🤩*

*_🏡 छत्रपती शिवाजी पार्क🌴_*
*_🌴गृहप्रकल्प-कुडाळ🏡_*

*👉 घेऊन आले आहेत…!स्मार्टसिटीच्या 🛣️ वाटेवर असलेल्या कुडाळात मध्यवर्ती भागात तयार ताबा 1BHK फ्लॅट फक्त १६ लाखात, 2 BHK फ्लॅट फक्त २७ लाखात तोही GST सह, तर १० लाखात मिळावा दुकान गाळा…!*

👉 *_पहिल्या पाच ग्राहकांना ही संधी…😍🥳🤩_*

*आठ बिल्डिंगच्या🏬 भव्य-दिव्य गृह प्रकल्पा 🏡 सोबत १५ हजार स्क्वेअर फूट गार्डन🏕️,गणेश मंदिर🛕,स्विमिंग पूल🗾,क्लब हाउस🏸,जिम 💪आणि प्रशस्त पार्किंगची🚘 सुविधा…!*💃

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २५० ची मेगा टाऊनशिप…🏬*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून चालत फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर…🚆*
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🛑 मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

*🏡 आमचा पत्ता:- साईट शिवाजी पार्क,सत्कार हॉटेल रोड,जुना बस स्टँड समोर,कुडाळ*

*📲 संपर्क :- **९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१*
*९४०४७५१५००*
_______________________

प्रतिक्रिया व्यक्त करा