You are currently viewing स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त काँग्रेसपक्षा मार्फत वैभववाडी येथे आजादी गौरव पदयात्रा

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त काँग्रेसपक्षा मार्फत वैभववाडी येथे आजादी गौरव पदयात्रा

वैभववाडी

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त काँग्रेसपक्षा मार्फत सुरू असलेली आजादी गौरव पदयात्रा वैभववाडी येथे काढण्यात आली. पदयात्रेत तिरंगा डौलाने फडकत होता त्याच बरोबर याद करो कुर्बानी असे लिहिलेल्या फलकावरील महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु,सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,लालबहादूर शास्त्री, गोपळकृष्ण गोखले अश्या अनेक स्वातंत्र्य सेनानीच्या फोटोमुळे स्वातंत्र्य चळवळीच्या आठवणीना उजाळा मिळाला. यावेळी देशभक्तीपर गीतानी वातारण प्रफुल्लित झाले होते. ‘भारत माता की जय’ ‘वंदे मातरम’ या घोषणानी वातावरण देशभक्तीमय झाले होते. वैभववाडीतील या पदयात्रेत काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते.

या पदयात्रेत सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, प्रदेश प्रतिनिधी सुगंधा साटम, मालवण विधानसभा उमेदवार अरविंद मोंडकर, जिल्हा सचिव आनंद परूळेकर, सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष प्रवीणभाई वरुणकर, तालुकाध्यक्ष दादामिया पाटणकर, माजी पंचायत समिती सभापती मीनाताई बोडके, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव, आनंद पवार, वसंत नाटेकर, बाळा पांचाळ, दिलीप रावराणे,शांताराम नेवरेकर, दिलीप नारकर,दिलदार नाचरे,श्रेया मुद्रस,अरुण कोलते,सुरेश टक्के, राजाराम सुतार,हरिश्चंद्र गुरव,संकेत सुतार,दस्तगीर नाचरे,बाबालाल थोडगे,बादशाहा लांजेकर,मुसा नाचरे,युसूफ नंदकर,महंमद लांजेकर, गनी नाचरे,कासीम चोचे,कासीम नंदकर,शेरपू चोचे,कादिर थोडगे, सिद्धेश शिंगरे,नेहा काळे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + ten =