You are currently viewing मान्सून होणार सक्रिय, २० जूनला ऑरेंज अलर्ट

मान्सून होणार सक्रिय, २० जूनला ऑरेंज अलर्ट

रत्नागिरी :

१८ जून पासून कोकणात मान्सून अधिक सक्रिय होण्याचा वेधशाळेचा अंदाज आहे.

मोसमी वारे पोहोचले असले तरी,सोबत पावसाचे ढग नसल्याने वरुणराजाने हुलकावणी दिली. त्यामुळे सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. प्रत्येकालाच पावसाची प्रतीक्षा आहे. हवामान खात्याच्या घोषणांकडे प्रत्येकाचे लक्ष आहे. त्यात ज्येष्ठ पौर्णिमेला अपेक्षेनुसार पाऊस पडला नाही.

मात्र आता भारतीय वेशाळेने अंदाज वर्तविल्याप्रमाणे १८ जून पासून कोकणात मान्सून अधिक सक्रिय होणार असून २० जूनचा ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा