You are currently viewing डॉ.पंजाबराव देशमुख मिशन आयएएस अकादमी कडून सनदी अधिकारी व अमरावती विभागीय महसूल आयुक्त डॉ.दिलीप पांढरपट्टे यांचे पुस्तक भेट देत केले आगळेवेगळे स्वागत

डॉ.पंजाबराव देशमुख मिशन आयएएस अकादमी कडून सनदी अधिकारी व अमरावती विभागीय महसूल आयुक्त डॉ.दिलीप पांढरपट्टे यांचे पुस्तक भेट देत केले आगळेवेगळे स्वागत

अमरावती

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सनदी अधिकारी तसेच सुप्रसिद्ध लेखक गझलकार व कवी डॉ. दिलीप पांढरपट्टे आज अमरावती येथे अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त म्हणून रुजू झाले आहेत.याप्रसंगी डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या मिशन आयएएसचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे श्री बाळासाहेब देशमुख व डॉ. मंगेश देशमुख यांनी त्यांचे शेतकऱ्यांची मुले झालीत कलेक्टर. मी आयएएस अधिकारी होणारच. तसेच प्रकाशझोत ही पुस्तके देऊन त्यांचे आगळे वेगळे स्वागत केले. याप्रसंगी श्री दिलीप पांढरपट्टे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. कविवर्य सुरेश भट हे अमरावतीला तपोवन येथे प्रा. नरेशचंद्र काठोळे यांच्याकडे मुक्कामी असायचे. तो संदर्भ देऊन श्री पांढरपट्टे म्हणाले सुरेश भट तुमच्याकडे मुक्कामी असताना मी तुमच्याकडे तपोवनला येऊन गेलो आहे. तसेच त्यांनी यावेळी धुळ्याच्या व नवी मुंबईच्या गझल संमेलनाच्याही आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी श्री मंगेश देशमुख यांनी कृषी निसर्गोपचार या योजनेची माहिती आयुक्तांना दिली. या यापूर्वी अपर जिल्हाधिकारी श्री रामदास सिद्धभट्टी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी श्री आशिष बिजवल तहसीलदार श्री माळवे उपजिल्हाधिकारी श्री राम लंके श्री खोडके आदी मान्यवरांनी माननीय आयुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .एक साहित्यिक व्यक्तिमत्व अमरावती शहराला विभागीय आयुक्त म्हणून लाभल्याबद्दल साहित्यिक वर्तुळात आनंदाची लहान पसरली आहे. प्रकाशनार्थ प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आयएएस अमरावती 9 8 9 6 700 3

प्रतिक्रिया व्यक्त करा