You are currently viewing चिंदर भटवाडी शाळेत वृक्षारोपण उपक्रम संपन्न ..

चिंदर भटवाडी शाळेत वृक्षारोपण उपक्रम संपन्न ..

मालवण :

महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधत चिंदर भटवाडी शाळेत वृक्षारोपण उपक्रम संपन्न झाला. शाळेचे मुख्याध्यापक शत्रुघ्न बुटे यांचाही वाढदिवस असल्याने त्यांच्या हस्ते कल्पवृक्ष रोपण करुन हा दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी सहशालेय उपक्रमाअंतर्गत शाळेत सुरू करण्यात आलेल्या ‘शनिवार आमचा स्पर्धेचा’ या उपक्रमाची सुरुवातही आजच्या प्रसंगी करण्यात आली. या उपक्रमांतर्गत महिन्याच्या शेवटच्या शनिवारी एक स्पर्धा घेण्यात येणार आहे. यात पालकांसाठीही एक गट असणार आहे. विजेत्यांना पालक पुरस्कृत बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येणार असून वर्ष अखेरीस बालआनंद मेळावा घेऊन पारितोषिक वितरण केले जाईल. रंगभरण स्पर्धा घेण्यात आली.

या उपक्रमाचे उद्घाटन उपसरपंच दीपक सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाला मालवण पंचायत समिती माजी सभापती धोंडी चिंदरकर यांनी शुभेच्छा देत शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य शशीकांत नाटेकर, सह शिक्षिका- निशिगंधा वझे, संपदा पाताडे, आरोग्य सेवक-संतोष गोसावी, आरोग्य अधिकारी विवेक घाडगे, आरोग्य सेवीका-सरीता जंगले, आशा सेविका-विनिता मसुरकर, सुनंदा अपराज, नंदिनी पावसकर, शशीकला पाताडे, चव्हाण, आबा पवार, रणजित दत्तदास, केळसकर, परब तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − seventeen =