You are currently viewing कथामाला मालवण कडून साने गुरुजींच्या *’श्यामची आई’ पुस्तकाचा वाढदिवस साजरा

कथामाला मालवण कडून साने गुरुजींच्या *’श्यामची आई’ पुस्तकाचा वाढदिवस साजरा

मालवण :

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण तालुका समितीच्या वतीने दिनांक 9/02/2024 रोजी महाराष्ट्र माऊली पूज्य साने गुरुजींच्या *’श्यामची आई’* पुस्तकाचा वाढदिवस वायंगणी ठाणेश्वर शाळेत साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री प्रकाश पेडणेकर सल्लागार समिती सदस्य मालवण कथामाला हे होते,तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री सुरेश ठाकूर अध्यक्ष कथामाला मालवण हे होते.गुरुजींच्या खरा तो एकची धर्म प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी कथानिवेदिका व प्रमुख कार्यकर्त्या श्रीम सुगंधा गुरव यांनी श्यामची आई पुस्तकातील ‘पुण्यात्मा यशवंत,श्रीम प्रतिभा मयेकर यांनी ‘भूतदया’ श्रुती गोगटे यांनी ‘अर्धनारी नटेश्वर ‘या कथा सादर केल्या.तसेच या शाळेच्या विद्यार्थिनी कु.यज्ञवी धुळे हिने’मनाची जडणघडण’ तर स्वरा पांजरी हिने ‘पत्रावळ’ या कथा सादर केल्या.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सुरेश ठाकूर म्हणाले,गेल्या नऊ दशकात या पुस्तकाच्या

10 लाखांहून जास्त प्रती वितरीत झाल्या असून 14 विविध भाषांत भाषांतर झाले आहे.या42 रात्रींतील 36 रात्री साने गुरुजींनी नाशिकच्या तुरुंगात असताना लिहिल्या.9 फेब्रुवारी1933 रोजी गुरुवारी या रात्री लिहायला गुरुजींनी सुरुवात केली आणि13 फेब्रुवारी1933 रोजी पहाटे मातेचा महिमा सांगणारा हा ग्रंथ पूर्णत्वास गेला.गुरुजींचे ह्रदय मातृप्रेमाने एवढे भरलेले होते की भराभर हा मातृग्रंथ कागदावर प्रकट झाला.आज प्रत्येक घरातील मातेजवळ मोबाईल ऐवजी हे मातृप्रेमाचे महंमंगल स्तोत्र असणे आवश्यक आहे.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना पेडणेकर सर म्हणाले, आज श्यामच्या आईचा हा वाढदिवस महाराष्ट्रातून फक्त माझ्या वायंगणी गावात होत आहे,याचा मला अभिमान वाटतो.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने माता भगिनी व पालक वर्ग उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला,श्यामची आई समजून घेतली याचे मला समाधान वाटते.यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना श्यामची आई पुस्तके वितरीत केली.

शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरुजींची गाणी सादर केली.या शाळेच्या मुख्याध्यापिका वैजयंती कदम मॅडम यांनी उत्तम व्यवस्थापन केले.सर्वांना खाऊ वाटप केले. व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री.दामोदर वायंगणकर, श्रीम रेडकर मॅडम, श्री कोचरेकर सर, मुख्याध्यापिका कदम मॅडम उपस्थित होत्या.सूत्रसंचालन व आभार कोचरेकर सरांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + twenty =