You are currently viewing तालुक्यातील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांबाबत मनसे कार्यकारी अभियंताना विचारणार जाब – परशुराम उपरकर

तालुक्यातील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांबाबत मनसे कार्यकारी अभियंताना विचारणार जाब – परशुराम उपरकर

सावंतवाडी

तालुक्यातील अनेक गावातील रस्ते उखडून निघाले आहेत. याबाबत अनेक लोकांच्या तक्रारी आमच्याकडे आल्याने याबाबत मनसे आज कार्यकारी अभियंता यांना जाब विचारणार असल्याची माहिती मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान कार्यकारी अभियंता हे सांगतात की, माझ्या मर्जीतील नाही तर आपल्या वर्ग मित्रांना काम दिले जात आहेत. मात्र नक्की ते वर्ग मित्र कोण आहेत. याचा शोध मनसे घेणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. याबाबत आम्ही चौकशीची मागणी करणार असून तसेच कार्यकारी अभियंता यांची तात्काळ बदली करण्याची मागणी निवडणूक आयोगकाडे करणार असल्याचे श्री.उपरकर यांनी सावंतवाडी मनसे कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत  सांगितले.

याबाबत उपकरकर म्हणाले की जिल्हयातील अवैध धंदे आज खुलेआम सुरू असून याला सत्ताधारी खासदार, आमदार याचा पाठिंबा असल्याचा आरोप त्यानी यावेळी केला आहे. तसेच आज अनेक लोकांची या अवैध व्यवसायामुळे अनेकांचे संसार देखील उध्वस्त झाले असून, एक युवा पिढी बर्बाद करण्याचं काम यांनी केला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री विद्यार्थी सेना जिल्हाअध्यक्ष कुणाल किनळेकर, संतोष भैरवकर, बांदा शहराध्यक्ष बाळा बहिरे, विभाग अध्यक्ष मंदार नाईक, नंदू परब, मुकुंद धाळगळकर, विश्वनाथ राऊळ, दिनेश मयेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा