You are currently viewing हार्मोनियम वादक श्री वासुदेव देसाई यांचा डेगवे-आंबेखणवाडीतील ग्रामस्था तर्फे सत्कार..।

हार्मोनियम वादक श्री वासुदेव देसाई यांचा डेगवे-आंबेखणवाडीतील ग्रामस्था तर्फे सत्कार..।

बांदा

डेगवे-आंबेखणवाडीचे सुपुत्र तथा श्री ब्राह्मणी,इश्वटी प्रासादिक भजन मंडळाचे बुवा हारमोनियम वादक मा.श्री. वासुदेव सखाराम देसाई यांनी गोपिकृष्ण गुरुकुल प्रा.संस्था ठाणे आयोजित आँनलाईन गणेशोत्सव गायन स्पर्धेत भाग घेतला होता.
सदर स्पर्धेचा निकाल घोषित झाला असून त्यांना “उत्कृष्ट भजन गायनाचाा बहुमान” प्राप्त झाला आहे.त्यामुळे डेगवे आंबेखणवाडीतील संगीत क्षेत्रातील ग्रामस्थांना अभिमानाची व समस्थ तरुणांना प्रेरणा देणारी बाब आहे.
त्यामुळे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप आज दि. २०/९/२०२१ रोजी सप्त सोमवार व्रत समाप्ती निमित्ताने रात्री ठिक ८:३० वाजता ब्राह्मणीस्थळ, आंबेखणवाडी येथे त्यांचा जाहिर सत्कार आयोजित केला होता.सदर सत्कार डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सरचिटणीस व ग्रंथमित्र श्री उल्हास देसाई यांच्या हस्ते त्यांना शाल,श्रीफळ,पुष्पहार देऊन सत्कार केला.यावेळी बोलताना उल्हास देसाई म्हणाले आजच्या भरकटलेल्या विचारात गुरफटलेल्या युवकांच्या युगात आपला एक तरुण संगीतक्षेत्रात झोकून देऊन काम करतो. हि समस्थ ग्रामस्थाना व आजच्या युवकांना प्रेरणा देणारी गोष्ट आहे.या माध्यमातून संगीत क्षेत्रात युवापिढी घडेल असा मला दृढ विश्वास वाटतो आहे.
या वेळी सत्काराला उत्तर देताना श्री वासुदेव देसाई म्हणाले मला हा सन्मान मिळाला तो माझे गुरुवर्य श्री शामसुंदर देसाई,तसेच माझे आई,वडील यांचे आशिवार्द आहे.व आंबेखणवाडीतील ग्रामस्थांना जाते.माझ्या पाठीवर.सत्कार रुपी जी कौतुकाची थाप दिली. ती मी कधीही विसरणार नाही.मी आपले मनापासून आभार मानतो.
यावेळी माजी सरपंच मंगलदास देसाई यांनी प्रास्ताविक केले.आभार शामसुंदर देसाई यांनी मांडले.श्री ब्राह्मणी,इश्वटी प्रासादिक भजन मंडळाचे व श्री ब्राह्मणी देवस्थान समितीचे पदाधिकारी,ग्रामस्थ ,सखाराम देसाई,वामन देसाई,गोपाळ देसाई,अत्माराम दे्साई,किशोर देसाई,योगेश मांजरेकर.अमृत देसाई,सदानंद देसाई विनय देसाई उपस्थित होते.

उल्हास देसाई,
सरचिटणीस

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 3 =