You are currently viewing बुद्ध पौर्णिमेच्या औचित्याने आयोजित जयभीम तरुण विकास मंडळ,मळगांवचे रक्तदान शिबीर संपन्न..

बुद्ध पौर्णिमेच्या औचित्याने आयोजित जयभीम तरुण विकास मंडळ,मळगांवचे रक्तदान शिबीर संपन्न..

सावंतवाडी

“रक्तदान जीवनदान मानवतेचे महाअभियान” अंतर्गत सोमवारी मळगांव येथे संपन्न रक्तदान शिबिरात 20 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले.जयभीम तरुण विकास मंडळ, मळगांव येथे हे शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.
बुद्ध पौर्णिमेच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेले हे शिबीर आज सोमवार दिनांक 16 मे 2022 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 यावेळेत माता रमाबाई आंबेडकर नगर मळगांव येथे पार पडले. या शिबिरात रमाबाई आंबेडकर नगर मधील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले हे शिबीर यशस्वी केले. या शिबिरावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. आकाश एडके, रक्तपेढी तंत्रज्ञ प्राजक्ता रेडकर, रक्तपेढी सहाय्यक अनिल खाडे, वाहन चालक असलम शेख, जयभीम तरुण विकास मंडळ, मळगांवचे अध्यक्ष बाळा जाधव, सचिव विलास जाधव, ग्रामपंचायत सदस्य लाडू जाधव,पोलीस पाटील रोशनी जाधव, पदाधिकारी रमाकांत जाधव, प्रकाश जाधव, सिद्धेश जाधव, दिपक जाधव, महेश जाधव, विकास जाधव, राजन जाधव, संतोष जाधव तसेच सामाजिक कार्यकर्ते गुरु गावकर, पत्रकार सुखदेव राऊळ व मंडळाचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा