You are currently viewing माजगाव सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उर्जितावस्था देणाऱ्या विविध योजना राबवा – मनीष दळवी

माजगाव सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उर्जितावस्था देणाऱ्या विविध योजना राबवा – मनीष दळवी

सावंतवाडी

माजगाव विकास सहकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उर्जितावस्था येण्यासाठी विविध योजना राबविण्याचा प्रयत्न करा, त्यासाठी लागणारे सहकार्य जिल्हा बँकेच्या माध्यमातून निश्चितच केले जाईल, कर्ज देणे ते वसूल करणे यावरच लक्ष केंद्रीत न करता शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने “मी” काम करीन,अशी ग्वाही जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज येथे दिली. दरम्यान येथील सोसायटीच्या चेअरमनपदी विष्णू गावडे, व्हाईस चेअरमनपदी गुरुनाथ भोसले तर सचिवपदी शशिकला दळवी यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी श्री. दळवी बोलत होते. ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी नंदिनी सामंत यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगांवकर, पंचायत समिती माजी सदस्य बाबू सावंत, सरपंच दिनेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य बाळा वेजरे, सुधीर सारंग,विनोद जाधव,आबा सावंत,अजय सावंत,अच्युत सावंत,मंगेश राठोड, आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × three =