You are currently viewing मांगेली फणसवाडी येथे पक्का बंधारा

मांगेली फणसवाडी येथे पक्का बंधारा

जिल्हा नियोजन मधून निधीची तरतूद; बाबुराव धुरी यांनी केले भूमिपूजन

दोडामार्ग / सुमित दळवी :

मांगेली गावात विकासाची गंगा येणार असून त्याची सुरुवात फणसवाडी येथून होत आहे, त्याचप्रमाणे गावात स्ट्रीटलाइट तसेच इतर अनेक कामे आतापर्यंत मार्गी लागलेली आहेत. मांगेलीतील एकूण भौगोलिक स्थिती पाहता येथील गाव एकमेकापासून दूर आहे, मात्र या वाड्यांना जोडण्याचे काम सुद्धा सध्याच्या आघाडी सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल याचाच एक भाग म्हणून मांगेली फणसवाडी येथे पक्क्या बंधाऱ्याची निर्मिती करून येथील असलेली पाण्याची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पंचायत समिती सदस्य व शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव धुरी यांनी सांगितले. हा पक्का बंधारा याठिकाणी बांधून त्यातून मांगेली फणस वाडी येथील लोकांना पाणीपुरवठा करण्याचे ध्येय असून त्यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन मधून आल्याचे त्यांनी सांगितले. खासदार विनायक राऊत यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले असून त्यांच्या प्रयत्नातून हा बंधारा या ठिकाणी उभा राहत आहे. लवकरच आता दूरवर पसरलेला मांगेली गाव रस्ते जोड प्रकल्पाच्या माध्यमातून एकत्र जोडण्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

यावेळी बाबुराव धुरी यांसह प्रभारी सरपंच श्री गवस, महिला आघाडी दोडामार्ग तालुकाप्रमुख श्रेयाली गवस, विजय गवस तसेच मांगेली ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा