You are currently viewing दोडामार्ग-वझरे येथे ७ मेला ‘नाट्यपराग: सुगम संगीत कार्यक्रम

दोडामार्ग-वझरे येथे ७ मेला ‘नाट्यपराग: सुगम संगीत कार्यक्रम

दोडामार्ग:

गोव्याच्या सीमेलगत असलेल्या गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे स्मृती संगीत संस्था वझरे आणि महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदुर्ग शाखा – दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ( ता . ७ ) सायंकाळी साडेसातला ‘ नाट्यपराग ‘ हा बहारदार सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . सदर कार्यक्रम वझरे येथील वझेबुवा स्मारकासमोर नारायण ( संतोष ) सिद्धये यांच्या अंगणात होणार आहे . सायंकाळी ७.३० वाजता दीपप्रज्वलन , वझे बुवांची प्रतिमा पूजन , मान्यवरांचे स्वागत होणार आहे . या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कासारवणे पेडणे येथील संगीत विशारद शिक्षक तसेच गोव्यातील प्रसिद्ध नाट्य कलाकार गोविंद मराठे उपस्थित राहणार आहेत . रात्री ८ वाजता मंदार केळकर , सौ . उर्वी केळकर , त मराठे , कु . आशय गाडगीळ हे कलाकार झा गायन सादर करणार आहेत . त्यांना हार्मोनियमवर दीपक पेंडसे , तबल्यावर वैभव वझे संगीतसाथ करणार आहेत . ध्वनीसंयो रुपेश मांद्रेकर यांचे आहे . कार्यक्रम निवेदन विभा वि . वझे करणार आहेत . कार्यक्रमांमुळे कलाकारांच्या कलागुण चालना मिळणार आहे , असे आयोजकाना सांगितले . या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन गायनाचार्य कै . रामकृष्णबुवा वझे स्मृती संगीत संस्था वझरेचे अध्यक्ष गंगाराम वझे , महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदुर्ग शाखा- दोडामार्गचे अध्यक्ष महादेव ( मनोज ) वझे यांनी केले आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा