You are currently viewing भोसले पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये कॅम्पस निवड

भोसले पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये कॅम्पस निवड

सावंतवाडी

येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमधील तृतीय वर्ष कॉम्प्युटर विभागाच्या सहा विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे नामांकित सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. निवड झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे – बाबली शिरोडकर व गायत्री प्रभू – केपीआयटी, मृणाल सावंतभोसले – विप्रो, तनुजा खरात, नूतन आचरेकर व सेजल गावडे – डीएक्ससी टेक्नोलॉजी.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, प्राचार्य गजानन भोसले व कॉम्प्युटर विभाग प्रमुख प्रशांत काटे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..

प्रतिक्रिया व्यक्त करा