You are currently viewing दशावतार कलाकार समिती, दोडामार्गचा पाचवा वर्धापन दिन ३० जून रोजी उत्साहात साजरा होणार

दशावतार कलाकार समिती, दोडामार्गचा पाचवा वर्धापन दिन ३० जून रोजी उत्साहात साजरा होणार

दशावतार कलाकार समिती, दोडामार्गचा पाचवा वर्धापन दिन ३० जून रोजी उत्साहात साजरा होणार

साटेली भेडशी,

दशावतार कलाकार समिती, दोडामार्ग (नोंदणी क्र. F-0005188 (SDD)/महाराष्ट्र) यांचा पाचवा वर्धापन दिन सोहळा मंगळवार, दिनांक ३० जून २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता भंडारा समाज रंगमंच, झरेबांबर, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी महत्त्वाची नियोजन बैठक शनिवार, दिनांक १३ जून २०२६ रोजी समितीचे खजिनदार श्री. राजेंद्र सहदेव बांदेकर यांच्या सरगवे पुनर्वसन येथील निवासस्थानी श्री. विलास नारायण गवस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करून विविध जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले.
सोहळ्याची सुरुवात सायंकाळी ६.०० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ व मनोगतांनी होणार असून, त्यानंतर सायंकाळी ७.०० वाजता दोडामार्ग तालुक्यातील निवडक आणि नामवंत दशावतारी कलाकारांच्या सहभागातून संयुक्त महान पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग “दिधले दान सौभाग्याचे” सादर करण्यात येणार आहे. याचबरोबर ज्येष्ठ दशावतार कलाकारांचा सत्कार तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळाही आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी समितीचे अध्यक्ष सुभाष नारायण लोंढे, सचिव शंकर मधुकर जाधव, सल्लगार कृष्णा (उली) यशवंत नाईक, खजिनदार राजेंद्र सहदेव बांदेकर,सहखजिनदार फटी रतनु गवस,सदस्य नारायण मनोहर खांबल, मधुसूदन तुकाराम गवस, संभाजी शंकर गवस, सतीश लाडू गवस, रामचंद्र बाबाजी गवस, अजिंक्य शिवाजी गवस, देवेंद्र विष्णू भैरवकर,नारायण महादेव गवस दीपक रामकृष्ण गवस, सुधीर बाबाजी परब आनंद बापू गवस, अभिमन्यू सहदेव बांदेकर,कृष्णा गणू कुंभार, भगवान वासुदेव नाईक
विलास नारायण गवस, भिकाजी अर्जुन गवस, प्रभाकर गोपाळ गवस,सागर नाईक (संचालक : नाईक दशावतार नाट्य मंडळ झरेबांबर ) सह आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा