You are currently viewing *साटेली मायनिंग बाबत राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागणार…. संजय नाईक

*साटेली मायनिंग बाबत राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागणार…. संजय नाईक

*साटेली मायनिंग बाबत राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागणार…. संजय नाईक*

साटेली गावातील बंद असलेल्या मायनिंग चालु करण्याबाबत आणि (डंप) साठवुन ठेवलेला माल नेण्याबाबत दिवाळी दसरा यावेळेत पडणारी दिवास्वप्न नि:र्फळच !
मायनिंगमुळे जमिनदार,शेतकरी वर्ग,बागायतदार,डंपरवाले,मायनिंग
मध्ये असलेले कामगार,ग्रामस्थ, यांचे लाखो करोडोंचे नुकसान आणि या नुकसानाचे सोयरसुतक नसलेले मायनिंग चालु करण्याबाबत हालचाली करत असतील तर ग्रामस्थांच्या तीव्र विरोधास सामोर जाव लागेलच!
या ग्रामस्थांच्या तीव्र भावना पाहता कुठलाही राजकीय पक्ष, पुढारी,अथवा अन्य स्वयंघोषित मायनिंग लीडर या विषयात पडुच नये!
आमच्या काजु बागायती!इतर बागायती, याची कत्तल आणि जमिनीचा फडशा पाडुन हरीत लवादाला फाट्यावर मारुन शेतकरी आणि शेतीच अतोनात नुकसान झालय, महीलांनी अंगावरचे दागदागीने विकुन डंपर व्यवसाय करण्यासाठी घरात हातभार लावला पण आज बॅंका,फायनांस याची वारेमाप कर्ज फेडताना ते हवालदिल झालेत.तेल ही गेल धुपही गेल हाती धुपाटण अशी या मायनिंग प्रकल्पाने अवस्था केलीय!
ना विकास फक्त भकास मग असले गावाला दिवाळखोरीत आणणारे प्रकल्प आणि एजंट हवेतच कशाला! सोनं मिळणारे मायनिंग म्हणुन या साटेली गावाची माध्यम आणि न्युजमध्ये बातम्या दिल्या जातात आणि गावातील लोकांची मात्र माती होते!
तसेच माळीण सारखी परस्थिती होईल अशी काढलेल्या मायनिंगची सध्या परस्थितीही आहे.
मायनिंग शेजारी घरेवाडीवस्ती,पाणी देवस्थानही अशी रचना आहे!
त्यामुळे या नुकसान आणि गावातील विकास याला योगदान याचा ताळतंत्र नसणारे मायनिंग आणि मायनिंग एजंट याला ग्रामस्थांचा विरोधच राहील. आणि न पेक्षा कायदेशिर कारवाईची तीव्र लढाई, लेखी आणि न्यायालयीन स्वरुपात आणि हरीत लवादा याच्या नुसार देखील दिली जाईल हे निश्चित!

तसेच मायनिंग मुळे कधीच भरून नयेणारे निसर्गाचे अतोनात नुकसान होत असून ज्या नैसर्गिक अधिवासाची, साधनसंपत्तीची निर्मिती होण्यास हजारो वर्षे लागली त्यास मायनिंगच्या रुपात काही मिनिटात ओरबाडण्याचे काम होत आहे. या मुळे हवेचे प्रदूषण, पाणी पातळी कमी होणे, जमिनीची धूप होणे, जमिनीची उत्पादनक्षमता कमी होणे, मायनिंगची वाहतूक करताना होणारी धूळ, अपघात अश्या अनेक वाईट परिणामांना साटेली तसेच आसपासच्या गावातील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे; त्यामुळे याबाबत राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार करणार असल्याचे संजय नाईक म्हणाले

*संवाद मीडिया*

*पाहिजेत..पाहिजेत.. पाहिजेत…!*

*अकाउंट : TALLY व पदवीधर आवश्यक.*

*सेल्समन : पदवीधर आवश्यक*

*आकर्षक पगार*

**स्थानिकांना प्राधान्य**

*संपर्क*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114207/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × two =