You are currently viewing भविष्यातील नोकर भरतीत स्थानिकच हवेत : आ. नितेश राणे

भविष्यातील नोकर भरतीत स्थानिकच हवेत : आ. नितेश राणे

भविष्यातील नोकर भरतीत स्थानिकच हवेत : आ. नितेश राणे

कणकवली

भविष्यात आपल्या जिल्ह्यात जी होणारी भरती आहे. या भरतीत आपल्या जिल्ह्याततीलच मुलं भरती झाली पाहिजेत. म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.२०१४ साली नारायण राणे साहेबांच्या हाती प्रशासन होते त्यावेळी आपला जिल्हा पहिल्या पाच क्रमांकावर होता.चांगल काम करायचं प्रशासन टिकवायचं असेल लोकांचा विकास करायचा असेल तर असा दरवेळी असे कार्यक्रम झाले पाहिजेत.जेव्हा शासकीय भरती होते तेव्हा जास्तीत जास्त तरूणांनी या परिक्षेसाठी सहभागी झाले पाहिजेत असे प्रतिपादन आम. नितेश राणे यानी केले. तळेरे- खारेपाटण भाजपा विभागीय पक्षाच्यावतीने जि.प.भरतीअंतर्गत मार्गदर्शन व सहाय्य शीबीर कार्यक्रमात विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय ,तळेरे येथिल शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी आम. नितेश राणे याच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी जि.प. सभापती जयेंद्र रावराणे ,माजी सभापती दिलीप तळेकर, सरपंच हनुमंत तळेकर, राजेश जाधव, उपसरपंच शैलेश सुर्वे, कुरंगवणे सरपंच ब्रम्हदंडे, दिलिप नावळे, संदिप घाडी,भाऊ राणे राजेश माळवदे, उदय बारस्कर, पांचाळ,दिनेश मुद्रस, चिन्मय तळेकर,दळवी महाविद्यालयाचे समन्वय वेलंगी,दिपक नांदलसकर, मुख्याध्यापक मांजरेकर, चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आम. राणे म्हणाले,अधिकारी आपल्या जिल्ह्यातील असतील तर आपल्या जिल्ह्यातील भौगोलिक माहिती त्याना असते तसेच आपल्या जिल्ह्यात कुठल्या प्रकारचा विकास हवा हे त्याला माहीती असते आणि तिथे आपल्याला जागा मिळावी यासाठी या प्रक्षिणाचा मोठा वाटा असेल .मुलं या भरतीसाठी शिफारस पत्र घेऊन येतात पण शिफारस का लागते, आपण अभ्यास व्यवस्थित केलेला नसतो त्यामुळे आपल्याला आत्मविश्वास कमी असतो त्यावेळी शिफारस करावी लागते. जिल्हा परिषद भरती मध्ये जी कोणती एजन्सी मार्फत भरती करण्यात येणार आहे त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की या भरती मध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलं आणि मुलींना न्याय मिळाला पाहिजे.आमची अशी इच्छा आहे की जास्तीत जास्त आपल्याच जिल्ह्यातील मुलं भरती व्हावीत आणि जिल्ह्याच्या विकासासाठी हातभार लावावा.

या परिक्षेसाठी आपल्या मुलांना रत्नागिरी किंवा कोल्हापूर या दोन ठिकाणी जावं लागणार आहे. या परीक्षेच्या यादी मध्ये रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्हा ही असावं असं सांगितलं आहे तसं पत्र ही देण्यात आले आहे.आमची एवढीच इच्छा आहे की जास्तीत जास्त आपलीच मुले या सर्व परीक्षेतून उत्तीर्ण होतील आणि जिल्ह्याच्या भरतीत प्रावीण्य मिळवतील असे सांगितले.तसेच दिलिप तळेकर ,राजेश जाधव यांनी मार्गदर्शन केले तर उपस्थितांना मार्गदर्शन व सहाय्य शिबिराला मार्गदर्शक म्हणून गुरुकुल करियर अकॅडमी ओरस चे प्रा. ढोनकूस व प्रा बी एस जांभेकर यांनी उपस्थित राहून बहुमूल्य मार्गदर्शन केले.यावेळी महाविद्यालयाच्या वतीने आम. राणे याचा सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.संख्येने जिल्ह्यातील तरूण, तरूणी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा