You are currently viewing सातोसे-रेल्वे फाटक परिसरात आढळलेल्या तब्बल ११ फूट मगरीस वनविभागाने केले जेरबंद

सातोसे-रेल्वे फाटक परिसरात आढळलेल्या तब्बल ११ फूट मगरीस वनविभागाने केले जेरबंद

सावंतवाडी

सातोसे येथील रेल्वे फाटक परिसरात आलेल्या तब्बल अकरा फुटी मगरीला जेरबंद करण्यात यश आले. ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती सरपंच बबन सातोसकर यांनी वनविभागाला दिली. त्यानुसार वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने “त्या” मगरीला पकडले व नैसर्गिक अधिवासात सोडले. दरम्यान या घटनेनंतर स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

यावेळी वनक्षेत्रपाल मदन क्षिरसागर, वनपाल चंद्रसेन धुरी, वनरक्षक आप्पासो राठोड, वनमजूर बबन रेडकर, चंद्रकांत पडते, माजी सरपंच वसंत धुरी, ग्रा.पं.सदस्य नीलेश साळगावकर, संदीप बर्डे, काशिनाथ पेडणेकर, सदानंद पायनाईक, रुपेश साळगावकर, भिसाजी पेडणेकर, नाना सातोसकर आदी उपस्थित होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित मगर येथील रेल्वे फटकाच्या मागील बाजूस आली होती. यावेळी ती काही ग्रामस्थांच्या निदर्शनास पडली. दरम्यान याबाबतची माहिती वनविभागाला मिळाल्या नंतर अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. व त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने “त्या, मगरीला जेरबंद केले. यावेळी मगरीला पाहण्यासाठी ग्रामस्थानी एकच गर्दी केली. ही मगर तेरेखोल नदीतून रेल्वे फाटकाजवळ आली असावी, अशी शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे. त्यानंतर त्या मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 9 =