कुडाळ तालुक्यात पूरसदृश्य स्थिती…

कुडाळ तालुक्यात पूरसदृश्य स्थिती…

डिगस ते हिर्लोक जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली

कुडाळ

कुडाळ तालुक्याला सोमवारी पावसाने झोडपून काढले. गेले तीन दिवस पावसाची संततधार सुरू असल्याने तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सतत पाऊस पडत राहिल्यास तालुक्यातील अनेक नदी नाल्यांच्या किनारील गावात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता असून कुडाळ तालुक्यातील डिगस ते हिर्लोक जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने या ठिकाणची वाहतूक काही तास बंद झाली होती.

कोकणात मोठ्या प्रमाणात दि. १२ जुन ते १५ जून या कालावधीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली होती. कुडाळ तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार नसला तरी शनिवारपासून पावसाची संततधार सुरु झाली होती.
रविवारी रात्रीपासून जोरदार पावसाने कुडाळ तालुक्याला झोडपून काढले. रात्रभर मुसळधार कोसळणा-या या मुसळधार पावसाने सोमवारी ही कुडाळ तालुक्याला झोडपून काढले.

सतत पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत होते. तर तालुक्यातुन वाहणाऱ्या कर्ली, भंगसाळ, निर्मला, बेल नदी तसेच नदी-नाल्यांची पात्रे तुडुंब भरून वाहत होती. त्यामुळे सतत पाऊस सुरू राहील्यास या नद्यांच्या किनाऱ्या लगतच्या गावात पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तर चांगल्या प्रकारे पाऊस बरसत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले. असून शेतीच्या प्रारंभीच्या कामाला वेग आला आहे.
दरम्यान या सतत कोसळणाऱ्या पावसामुळे डिगस ते हिर्लोक जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर पाणी आले होते त्यामुळे या गावांचा संपर्क तुटला होता काही तास ही वाहतूक बंद होती या रस्त्यावरील या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा