You are currently viewing श्रीरामवाडी मच्छीमारांचे मस्य कार्यालयासमोर बेमुदत साखळी धरणे आंदोलन

श्रीरामवाडी मच्छीमारांचे मस्य कार्यालयासमोर बेमुदत साखळी धरणे आंदोलन

मालवण

निवती खाडीच्या बाजूला सुमारे 200 मीटर लांबीच्या प्रवाहात निवती ग्रामस्थांनी नांगरुन ठेवलेल्या बोटीमुळे श्रीरामवाडी येथील मच्छीमारांना बोटीच्या वाहातूकीस अडथळा निर्माण होत असल्याने संबंधित मच्छीमारांच्या विरोधात कार्यवाही व्हावी या मागणीसाठी आज सोमवारी श्रीराम ग्रामस्थ मंडळ श्रीरामवाडी येथील मच्छीमारांनी येथील तालुका मस्य कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.

या आंदोलनात मंडळाचे अध्यक्ष प्रशांत निवतकर, सचिव सागर मालंडकर, खजिनदार सुरेश कोरेकर, रामचंद्र परब, गुरुनाथ सारंग, राजन खवणेकर, विकास शिवणकर, द्या पराडकर सह 100 मच्छीमार सहभागी झाले आहेत.
या धरणे आंदोलन स्थळी शिवसेना बाळासाहेबांची चे सुनिल डूबळे, सचिन देसाई, वेंगुर्ले पोलीस निरीक्षक अतुल जाधव, निवती पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राणे यांनी भेट दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 5 =