You are currently viewing राणेंच्या प्रचाराचा नांदगाव येथे शुभारंभ…

राणेंच्या प्रचाराचा नांदगाव येथे शुभारंभ…

राणेंच्या प्रचाराचा नांदगाव येथे शुभारंभ…

कणकवली

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या नांदगाव विभागातील प्रचाराचा शुभारंभ नांदगाव तिठा येथे करण्यात आला. नांदगाव विभागातून राणेंना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला.
प्रचाराचा शुभारंभ भाजपच्या अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष रज्जाक बटवाले यांच्या हस्ते झाला.

यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, नांदगावचे सरपंच रविराज उर्फ भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, माजी सरपंच संजय पाटील, आफ्रोजा नावलेकर, माजी उपसरपंच नीरज मोरये, ओटवचे सरपंच रुहिता तांबे, नांदगाव सोसायटीचे संचालक आब्बास बटवाले, कमलेश पाटील, हरिश्‍चंद्र बिडये, मंगेश बोभाटे, अवधूत गगनग्रास, तोसीम नावलेकर, ग्रा. पं. सदस्य विठोबा कांदळकर, अनिकेत तांबे, संतोष बिडये, शंकर मोरये, जैबा नावलेकर, अक्षता खोत, पूजा सावंत, नमिता मोरये, मंगेश पाटील, यासिर मास्के, आयनलचे माजी सरपंच बापू फाटक, कोळोशीचे माजी सरपंच सुशील इंदप, मुबारक साठविलकर, गंगाधर बोभाटे, राजू खोत, श्यामराव परब, वसीम साटविलकर श्री. जाधव, श्री. गवस, श्री. साटविलकर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा