You are currently viewing जिल्ह्यातील दबंग नेता शिवसेनेच्या वाटेवर…..

जिल्ह्यातील दबंग नेता शिवसेनेच्या वाटेवर…..

सावंतवाडीतून विधानसभेसाठी “तोच” प्रबळ दावेदार..

राजकारणात घडामोडी या घडतच असतात. एकीकडे नारायण राणे शिवसेनेतून काँग्रेस करत भाजपावासी झाले तर दुसरीकडे भाजपामध्ये प्रवेश करून संसार थाटला नसतानाच संदेश पारकर शिवसेनेत गेले. हा पाठशिवणीचा खेळ सुरू असतानाच राजकीय सारिपटावर अतिशय बुद्धिमान म्हणून ज्यांची ओळख आहे, कोणाचेही सरकारी खात्यातील असो वा इतर कुठलेही काम लीलया करण्याची धमक असणारे एक राजकीय नेतृत्व पुन्हा एकदा नव्या पक्षाचा त्याग करून शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
राजकीय नेत्यांच्या अपेक्षा या दिवसेंदिवस वाढत आहेत आणि आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी सद्यस्थितीत असलेला आपला पक्ष येत्या विधानसभेसाठी उमेदवार म्हणून आपला विचार करेल याची खात्री नसल्याने आणि सावंतवाडी मतदारसंघातून भविष्याच्या दृष्टीने उत्तम संधी असल्याने हा राजकीय नेता लवकरच शिवबंधनात अडकणार असल्याचे दिसून येत आहे. जिल्हास्तरावर असो वा मंत्रालय स्तरावर त्याच्या शब्दाला मान आहे, वरीष्ठस्तरावर चांगल्या ओळखी आहेत, आणि जिल्ह्याची तसेच सावंतवाडी मतदारसंघाची सखोल माहिती आहे, त्यामुळे भविष्यात सावंतवाडीतून ओपनिंग करायला कुठलीच अडचण नसल्याने त्याने शिवसेना प्रवेशाचा योग्य पर्याय निवडला आहे.
शिवसेना प्रवेशाची बोलणी अंतिम टप्प्यात असल्याने आणि शिवसेनेच्या विरोधकांना पुरून उरण्याची ताकद असल्याने येत्या काही दिवसात या दबंग नेत्याचा शिवसेनेत प्रवेश झाल्यास आश्चर्य वाटू नये.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × four =