मालवण :
किर्लोस येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. विलास सावंत हे दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील “आमची माती आमची माणसं” कार्यक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम आज सायंकाळी ६.३० वाजता प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमात नैसर्गिक शेतीचे विविध पैलू आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजना बद्दल सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. डॉ. वनिता घाडगे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. शेतकऱ्यांनी आणि शेतीमध्ये आवड असलेल्या सर्वांनी हा कार्यक्रम अवश्य पहावा असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन मिळेल आणि शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान योजनांची माहिती मिळण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.