You are currently viewing नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त भुईबावडा येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप…

नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त भुईबावडा येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप…

वैभववाडी

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. दहावी व बारावीच्या परीक्षेत गावच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. शहर व ग्रामीण असा भेदभाव न करता विद्यार्थ्यांनी मिळणाऱ्या सुविधांचा पुरेपूर वापर करून उचित ध्येय गाठले पाहीजे. असेच यापुढे यश मिळवून गावचं व आपल्या आईवडिलांचे नाव उज्वल करा. असे प्रतिपादन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र साठे यांनी व्यक्त केले.

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त जि. प. कोळपे मतदार संघातील भुईबावडा, नेर्ले व हेत येथील विद्यालयात विद्यार्थ्यांना ४ चार हजार वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच दहावी, बारावीत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य राजेंद्र राणे, मनोहर फोंडके, पप्पू इंदुलकर, संस्था अध्यक्ष श्री. इंदुलकर, धनाजी पवार, भुईबावडा सरपंच बाजीराव मोरे, मनोहर मोरे, मुख्याध्यापक श्री. भिसे, तानाजी मोरे, संतोष भुतार्णे, आकोबा मोरे, रवींद्र सुर्वे व भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साठे म्हणाले, मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी तालुक्यात शैक्षणिक विकासात चांगले काम केले आहे. एकाच वेळी मतदारसंघातील जवळपास दीडशे शाळा त्यांनी डिजिटल केल्या. याचा चांगला फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होत आहे असे सांगितले. नासीर काझी, हुसेन लांजेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

भुईबावडा, नेर्ले व हेत येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच दहावी व बारावी इयत्तेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 1 =