You are currently viewing सावंतवाडीतील मैला व्यवस्थापन प्रक्रिया केंद्राच्या क्षमतेसाठी निधीची आवश्यकता

सावंतवाडीतील मैला व्यवस्थापन प्रक्रिया केंद्राच्या क्षमतेसाठी निधीची आवश्यकता

तातडीने निधी मंजूर करावा : उपमुख्यमंत्र्यांचे सावंतवाडी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी वेधले लक्ष

सावंतवाडी

सावंतवाडीतील मैला व्यवस्थापन प्रक्रिया केंद्राची क्षमता 5kld असून, या प्रक्रिया केंद्रात जास्त मैला उपसा करणे शक्य होत नसल्याने शहरात शासनाने नव्याने 15kld क्षमतेच्या मैला व्यवस्थापन प्रक्रिया केंद्रास मंजुरी दिली असून, यासाठी कोणत्याही प्रकारचा निधी मंजूर करण्यात आला नसून, तातडीने हा निंधी मंजूर करावा. या कामासाठी पस्तीस लाख रुपये निधी आवश्यक असून, तो उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सावंतवाडी राष्ट्रवादीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष अर्चना घारे-परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवा टेमकर, आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा