You are currently viewing कणकवली तालुक्यात पावसाचा जोर कायम 

कणकवली तालुक्यात पावसाचा जोर कायम 

जानवली, गडनदीला पूर, आचरा मार्गावर पाणी, केटी बंधारे ओव्हरफ्लो…!

कणकवली

कणकवली तालुक्याला शुक्रवारी रात्री पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जानवली व गडनदीला पूर आल्याने लगतच्या भागांना पुराचा वेढा पडला. जानवलीनदीला पूर आल्यामुळे आचरा मार्गावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली.गडनदीवरील केटीबंधारे पाण्याखाली गेले असून मराठा मंडळ लगत असलेला केटी बंधाऱ्यावरून पाणी गेल्याने या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांचा कणकवली शहराचा व वागदे गावाचा संपर्क तुटला आहे.

कणकवली तालुक्यात गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे नदी-नाले तंडुब झाले आहेत. शुक्रवारी रात्री पावसाने घाटमाथ्यासह जोरदार
तडाखा दिला. परिमाणी जानवली व गडनदीला पूर आला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जानवली नदीचे पाणी आचरा रस्त्यावर आल्याने हा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात मालवणकडे जाणाऱ्यांचे हाल झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिल्यानंतर गुरुवार व शुक्रवारी जिल्हाधिकारी सुट्टी जाहीर केली होती. मात्र,शनिवारी सकाळीच आचरा मार्गावर पाणी आल्यामुळे याठिकाणी असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जाणे शक्य झाले नाही. नागरिकांनाही मागे फिरावे लागले. गडनदीवरील केटी बंधारे ओवर प्लो झाल्यामुळे तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मराठा मंडळ नजीक असलेल्या केटीबंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले असून पाण्याच्या प्रवाहाने मोठे ओढके बंधाऱ्यात अडकून पडले आहेत. पाण्याचा प्रवाहामुळे हे ओढके बंधाऱ्याला आढळत असल्याने बंधारा कमकुवत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे ओढके काढून टाकण्याची मागणी होत आहे. दरम्यान पाणी आलेल्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करत हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. तर वाहतूक ही ठप्प होती. व्यापारी विजय उर्फ बापू पारकर यांनी सबंधित विभागास दिली. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प देखील झाली होती. वाढलेल्या पाणी पातळी बाबतची माहिती व्यापारी विजय उर्फ बापू पारकर यांनी सबंधित विभागास दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − 7 =