You are currently viewing पुष्पसेन सावंत ज्यु. कॉलेज आणि सिंधुदुर्ग ॲकॅडमीचे अभूतपूर्व यश 

पुष्पसेन सावंत ज्यु. कॉलेज आणि सिंधुदुर्ग ॲकॅडमीचे अभूतपूर्व यश 

सलग पाचव्या वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम.

बोर्ड परीक्षा इ. १२ वी २०२२ चा निकाल १०० टक्के.

कुडाळ :

पुष्पसेन सावंत जुनियर कॉलेज आणि सिंधुदुर्ग ॲकॅडमीच्या मार्च एप्रिल २०२२ मध्ये झालेल्या इ.१२वी परीक्षेत विज्ञान शाखेत १९ विद्यार्थी बसलेपैकी १९ उत्तीर्ण होऊन निकाल १००%टक्के लागला. त्यापैकी १६ विद्यार्थी हे ८०% च्या वर गुणांनी तर ३विद्यार्थी ७५% गुणांनी उत्तीर्ण झाले.

विज्ञान विभागातील कु. मृदुला आचरेकर ८६.८३% प्रथम क्रमांक, कु. आस्था मर्गज ८६.३३% द्वितीय क्रमांक , तर कु. दिव्या तायडे ८५.८३% तृतीय क्रमांक, कु. रितिका सावंत ८५.३३% चौथा क्रमांक, तर कु. विराज कुलकर्णी ८४.३३% पाचवा क्रमांक पटकावला आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संचालक, प्र.मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 2 =