You are currently viewing हटकर कोष्टी समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

हटकर कोष्टी समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

इचलकरंजी

इचलकरंजी येथे हटकर कोष्टी समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार व विशेष गौरव पुरस्कार प्रदान तसेच चौंडेश्वरी सूतगिरणी नूतन संचालकांचा सत्कार सोहळा
हटकर कोष्टी समाजाचे अध्यक्ष शिवकांत मेत्री ,
प्रमुख पाहुणे राज्याध्यक्ष नंदकुमार वसवाडे, देवांग समाज अध्यक्ष विश्वनाथ मुसळे, बनशंकरी ट्रस्ट अध्यक्ष अमित कबाडे, महिला अध्यक्षा स्वाती मेत्री यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

इचलकरंजी येथे हटकर कोष्टी समाजाच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात.याच अनुषंगाने समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार व विशेष गौरव पुरस्कार प्रदान तसेच चौंडेश्वरी सूतगिरणी नूतन संचालकांचा सत्कार सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते बनशंकरी देवीच्या प्रतिमेचे पूजन आणि दिपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत युवक मंडळाचे अध्यक्ष अमित खानाज यांनी केले. यावेळी चौंडेश्वरी सूतगिरणीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच दहावी, बारावी व डिप्लोमा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी आणि विशेष प्राविण्य प्राप्त ९० हुन अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तर प्रा. विरुपाक्ष खानाज व सौ. सुनिता तेलसिंगे यांना समाजभूषण, संतोष वरुटे, रमेश खराडे, संजय डफळे यांना युवा उद्योजक, विजय कडगावे, राजन मुठाणे, पूजा टाकवडे यांना समाजगौरव आणि व्यंकटेश उरणे, ऋतुजा विभूते, वृषाली विभूते, प्राची करोशी, स्नेहा होनमुटे, वरद म्हामणे, शर्विल हळदे यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी हटकर कोष्टी समाजाचे अध्यक्ष शिवकांत मेत्री यांनी
समाजातील यशस्वी उद्योजक आणि गुणवंतांना शोधून त्यांचा उचित सन्मान समाजाच्या वतीने केला जातो. ही चांगली सामाजिक बांधिलकी असल्याचे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमासाठी हटकर कोष्टी समाज महिला मंडळाचे योगदान लाभले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी हेमंत वरुटे, किसन अक्कतंगेरहाळ, दीपक वस्त्रे, श्रीशैल जेऊर, ऋषिकेश हळदे, अरविंद वठारे, रजनीकांत लठ्ठे, विवेक हासबे, पवन तेलसिंगे, वासुदेव आदर्शे, श्रीनिवास उरणे, विजय गदाळे, विनायक वरुटे यांच्यासह वर्किंग कमिटीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी चौंडेश्वरी सूतगिरणीचे सर्व संचालक तसेच समाजातील मान्यवर, महिला तसेच विद्यार्थी, पालक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पूजा पारीशवाड, चिंतामणी पारीशवाड यांनी केले.आभार चैतन्य नेजे यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + 5 =