You are currently viewing मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांनी स्वीकारला पदभार 

मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांनी स्वीकारला पदभार 

मालवण

मालवण तहसील कार्यालयाचे नूतन तहसीलदार म्हणून वर्षा झालटे यांनी आज पदभार स्वीकारला. नायब तहसिलदार, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांची भेट घेत स्वागत केले.

२००४-०५ या वर्षी सेवेत रुजू झालेल्या वर्षा झालटे यांनी कोकण विभाग रायगड येथून सेवेस सुरवात केली. त्यानंतर शहापूर ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे, करमणूक कर अधिकारी मुंबई उपनगर येथे त्या कार्यरत होत्या. २०१३-१४ या वर्षी बढती मिळून त्या एमएमआरडीए व त्यानंतर भूमी संपादन पुनर्वसन पुनर्स्थापना नागपूर या ठिकाणी कार्यरत होत्या. नुकतीच त्यांची मालवण तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली. आज त्यांनी पदभार स्वीकारला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − five =