You are currently viewing निकृष्ठ दर्जाचे काम हळवल ग्रामस्थांनी रोखले..

निकृष्ठ दर्जाचे काम हळवल ग्रामस्थांनी रोखले..

कणकवली :

 

मुख्यमंत्री सडक योजना अंतर्गत हळवल ते शिवडाव मार्गाचे सुमारे २२ लाखाचे काम निकृष्ठ दर्जाचे असल्याचा ठपका ठेवत हळवल ग्रामस्थांनी रस्त्याचे काम रोखले. रस्त्याला लागणाऱ्या डांबराचे प्रमाण खुप कमी असल्याने रस्त्यावर टाकलेली खडी हाताने निघत असल्याने ग्रामस्थानी नाराजी व्यक्त केली.

हळवल परबवाडी ते शिवडावपर्यंत जाणाऱ्या मार्गाची दुर्दशा झाली होती. अथक प्रयत्नानंतर या मार्गासाठी सुमारे २२ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत प्राप्त झाला होता.

दोन दिवसांपूर्वी या मार्गाचे काम सुरू करण्यात आले. मात्र हे काम करत असताना डांबर कमी प्रमाणात वापरण्यात येत असल्याचे हळवल ग्रामस्थांच्या निदर्शनात आले. या मार्गावरून हळवल शिवडाव तसेच कनेडी येथे जाणारे अनेक ग्रामस्थ ये जा करत असतात रहदारीचा रस्ता असल्याने तो सुस्थितीत असावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचा ठपका ठेवत ग्रामस्थांनी अभियंता व ठेकेदार येत नाहीत तोवर काम बंद ठेवण्याचा इशारा कामगारांना दिला. यावर संबंधीत ठेकेदार व बांधकाम अभियंता यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. व काम चांगल्या प्रतीचे करून देऊ असे आश्वासन दिले त्यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन स्थगित केले.

यावेळी हळवल सरपंच दिपक गुरव, उपसरपंच अरुण राऊळ, सुभाष परब, सुजाता परब, वामन परब, दीपक राऊळ, किरण राऊळ, दीपेश परब, अनिकेत परब, मधुकर पाडावे, प्रकाश पवार, हर्षल परब, करण गावडे, ऋषी गावडे, संतोष परब, विराज परब, ऋषी राऊळ, मिथुन लाड, सुहास लाड, सचिन परब, भरत गावडे, सतीश गावडे, रोहन राणे, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 18 =