You are currently viewing महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती दोडामार्ग शिष्टमंडळाने घेतली गटशिक्षणाधिकाऱ्यांची भेट

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती दोडामार्ग शिष्टमंडळाने घेतली गटशिक्षणाधिकाऱ्यांची भेट

दोडामार्ग

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती दोडामार्गच्या शिष्टमंडळाने दोडामार्ग प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत दोडामार्ग गटशिक्षणाधिकारी नदाफ यांची भेट घेवून लक्ष वेधले व सविस्तर चर्चा केली.
कोरोना कालावधीत विविध ठिकाणी कोरोना योद्धा म्हणून सेवा बजावलेल्या शिक्षकांची सेवा पुस्तकात नोंद शिक्षणाधिका-यांच्या मार्गदर्शनाने करण्याचे आश्वासीत केले.सातव्या वेतन आयोगाच्या दुस-या हप्त्याची, वरिष्ठ वेतनश्रेणी फरकाची,व २०-२१ मध्ये समग मधून बांधकाम पूर्ण केलेल्य उर्वरीत अनुदानाची मागणी जिल्हा कार्यालयाकडे केलेली आहे. सदर अनुदान प्राप्त होताच वितरीत करण्यात येईल.सन २१-२२ मध्ये मंजूर झालेल्या वरिष्ठ वेतन श्रेणीची वेतन निश्चिती करुन एप्रिल महिन्यात सुधारीत वेतन अदा करण्याचे अाश्वासीत केले .सातव्य वेतन आयोगाची सेवापुस्तके वित्तविभाग सिंधुदूर्गकडून तपासून घेण्याचे नियोजन करण्याचे अश्वासीत केले.शिक्षकांचे रजा मंजुरी आदेश वेळीच देण्याचे मान्य केल.
सन २२-२३ चे वरिष्ट वेतन श्रेणीचे परिपूर्ण प्रस्ताव ३१ मार्च २२ पर्यंत १२ वर्षे पूर्ण होणा-या शिक्षकांचे प्रसताव वेळीच पाठविण्यात येतील असे आश्वासीत केले.कार्यालयाकडे प्राप्त होणारे शिक्षकांचे प्रस्ताव विनाविलंब वरीष्ट कार्यालयाकडे पाठवण्यात येतील.सन २१-२२ मध्ये स्वच्छ विद्यालय व शाळा सिद्धी दोडामार्ग सर्व शाळांनी वेळीच भरल्याने दोडामार्ग तालुक्याच्या जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला. त्याबद्दल सर्व शिक्षकांचे गटशिक्षणाधिकारी नदाफ यांनी अभिनंदन केले.
या चर्चेवेळी राज्य उपाध्यक्ष दयानंद नाईक,जिल्हा सचिव अरुण पवार,तालुकाध्यक्ष मणिपाल राऊळ, सचिव सखाराम झोरे,तालुका उपाध्यक्ष राकेश कर्पे,निलेश सावंत, तालुका सल्लागार जयेंद्र बिर्जे,कोषाध्यक्ष रामा गवस,आयी केंद्र संघटक प्रभाकर राठोड,सदस्य बाबुराव घोगळे ,प्रशासनाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी नदाफ ,वरिष्ठ लिपिक अमेय, कनिष्ट लिपिक घाडी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा