You are currently viewing महागाईच्या मुद्द्यावर सिंधुदुर्गात काँग्रेसचे उद्या उपोषण

महागाईच्या मुद्द्यावर सिंधुदुर्गात काँग्रेसचे उद्या उपोषण

सिंधुदूर्ग

तिनकाळे कृषी कायदे तसेच महागाईच्या मुद्द्यांवर केंद्रातील मोदी सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी संघटनांनी 26 मार्चला भारत बंद पुकारला आहे. या बंदला काँग्रेस पक्षाने सक्रिय पाठिंबा दिला असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यानी शेतक-यांच्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी उपोषण करण्याचा आदेश दिला आहे. नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात शुक्रवार दिनांक 26 मार्च रोजी सकाळी 11 ते 4 या वेळेत तहसीलदार ऑफिस जवळ उपोषण करण्यात येणार आहे तरी तालुक्यातील जिल्हा पदाधिकारी,तालुका पदाधिकारी,फ्रंटल विभागाचे, सेलचे पदाधिकारी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपआपल्या तालुक्यात उपोषण स्थळी उपस्थित राहावे. असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा