You are currently viewing कोळोशी पोटनिवडणूक बिनविरोध

कोळोशी पोटनिवडणूक बिनविरोध

नवनिर्वाचित सदस्या गिता पावसकर यांचे नितेश राणे यांनी केले अभिनंदन

नांदगाव
कणकवली तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूक लागल्या होत्या .या अनुषंगाने कोळोशी ग्रामपंचायत प्रभाव क्रमांक 2 सर्वसाधारण सदस्या असलेल्या सानवी चव्हाण यांनी नोकरी निमित्त राजीनामा दिल्यानंतर सदर जागा रिक्त झाली होती .यात सौ.गिता महादेव पावसकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्या बिनविरोध निवड झाली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
सदर नवनिर्वाचित सदस्या सौ. पावसकर या भाजपा पुरस्कृत असल्याने आमदार नितेश राणे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री राजन तेली,तालूकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,तालूका सरचिटणीस व असलदे सरपंच पंढरी वायंगणकर ,कोळोशी सरपंच सौ.रितीका सावंत,माजी सरपंच सुशिल इंदप, विश्वनाथ कदम आदी उपस्थित होते.
त्यांच्या बिनविरोध निवड झाली असल्याने कोळोशी गावातून अभिनंदन केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 5 =