शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करावा करता येणार
सिंधुदुर्ग
इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांनी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक उदयसिंग गायकवाड यांनी यांनी केले आहे.
वसतिगृह प्रवेशासाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जात दाखला व वैध जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे. तसेच विद्यार्थ्याचे कमाल वय ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे.
उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार व प्रवर्गनिहाय आरक्षणानुसार प्रवेश देण्यात येईल. यासाठी इयत्ता १२ वीतील गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाणार आहे. सन २०२६-२७ साठी बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. तसेच एम.ए., एम.एस्सी. आदी बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करावा. अर्जाची एक प्रत इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतिगृह, बांधकरवाडी, कणकवली येथे आवश्यक कागदपत्रांसह जमा करावी.
सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.