You are currently viewing कणकवलीत उद्या शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ…

कणकवलीत उद्या शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ…

कणकवली शहर शिवसेनेच्यावतीने विविध कार्यक्रम…

कणकवली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ​उद्या २७ जुलैला कणकवली शहर शिवसेनेच्यावतीने शहरात शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ होणार आहे. तसेच शिवसेना कणकवलीच्या वतीने
विविध कार्यक्रम होणार आहेत.
कणकवली स्वयंभू मंदिर येथे उद्या ​२७ रोजी सकाळी ​८ वा. दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते हा दुग्धाभिषेक होणार असून, यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत व शिवसेना पदाधिकारी नगरसेवक व शिवसैनिक यावेळी उपस्थित राहणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना नगरसेवक गटनेते सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर, शहर प्रमुख शेखर राणे यांनी केले आहे.
शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या माध्यमातूनही कणकवली शहरात शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ होणार आहे. ​१७ प्रभागात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच अतुल रावराणे यांच्या माध्यमातून मोफत छत्री वाटप व भैरीभवानी प्रतिष्ठान च्या माध्यमातून शहरातील शेतकऱ्यांना मोफत काजू कलमाचे वाटप देखील केले जाणार आहे. या शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने कणकवली शहरातील १७ प्रभागांमध्ये जे नागरिक अजून कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणापासून वंचित आहेत त्यांना लवकरात लवकर लसीकरण करण्याबाबत नियोजन केले जाणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × three =