You are currently viewing “फार्मर्स विथ मोदी!” … सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकरी ट्रॅक्टर मोर्चाद्वारे केंद्राच्या कृषी विधेयकाला समर्थन देण्यासाठी सरसावले.

“फार्मर्स विथ मोदी!” … सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकरी ट्रॅक्टर मोर्चाद्वारे केंद्राच्या कृषी विधेयकाला समर्थन देण्यासाठी सरसावले.

कणकवलीत प्रांत कार्यालयावर देणार ट्रॅक्टरसह धडक!!!

शेतकऱ्यांच्या हिताच्या असलेल्या केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाबाबत काही देशविघातक शक्ती वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड झाले आहे. शेतकऱ्यांच्या मनात विधेयकाबाबत चुकीचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, त्यांना भडकावुन आंदोलनात उतरवण्याचे षडयंत्र आखले जात आहे.

असे असताना, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र या प्रयत्नांना शेतकऱ्यांनी भीक न घालता मोदींच्या पाठीशी रहात ठाम समर्थन दर्शवले आहे. आमदार नितेश राणे यांच्या कणकवली विधानसभा मतदार संघातले शेतकरी मोठ्या संख्येने प्रांत कार्यालयावर आपापल्या ट्रॅक्टरसह धडक देत आहेत. विशेष म्हणजे या धडकेतुन केंद्राच्या विधेयकाला आपले जाहीर समर्थन ते देत आहेत. गावागावातुन केंद्राच्या विधेयकाला मिळणारे उत्स्फूर्त समर्थन हे भाजपाच्या दृष्टीने अर्थातच सुचिन्ह म्हणता येईल.

केंद्र सरकारच्या नवीन कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ ७ जानेवारी २०१९ रोजी निघणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चाला भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.आमदार चंद्रकांतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री तथा खासदार मा.नारायणराव राणे, भाजपा प्रदेश सरचिटणीस मा.आम.रविंद्रजी चव्हाण, भारतीय किसान मोर्चा प्रांताध्यक्ष मा. अनिलजी बोंडे, कणकवली विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.नितेशजी राणे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मा.राजनजी तेली, प्रदेश चिटणीस मा.प्रमोदजी जठार उपस्थित राहणार आहेत. सदर मोर्चा मुडेश्वर मैदान कणकवली येथून सकाळी ठीक अकरा वाजता निघणार असून नरडवे रोड मार्गे प्रांत कार्यालय येथे जाऊन उपजिल्हा रुग्णालयासमोरील भाजपा कार्यालय येथे सर्व मान्यवरांची सभा होऊन मोर्चाचा समारोप होणार आहे. या मोर्चाचे जिल्ह्यात मोठे औत्सुक्य निर्माण झाले असून त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या ट्रॅक्टर मोर्चात उपस्थित रहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग भाजपाचे जिल्हाध्यक्ष मा.राजनजी तेली यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + 14 =