You are currently viewing राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रेचा उद्देश गावागावात पोहोचवण्यासाठी हातसे हात जोडो कार्यक्रम- मा. खासदार हुसेन दलवाई

राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रेचा उद्देश गावागावात पोहोचवण्यासाठी हातसे हात जोडो कार्यक्रम- मा. खासदार हुसेन दलवाई

*राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रेचा उद्देश गावागावात पोहोचवण्यासाठी हातसे हात जोडो कार्यक्रम- मा. खासदार हुसेन दलवाई*

अखिल भारतीय काँग्रेसच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभरात *हातसे हात जोडो* हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमाच्या पूर्व नियोजनासाठी जिल्हा निरिक्षक माजी खासदार हुसेन दलवाई व प्रदेश सरचिटणीस राजन भोसले यांच्या उपस्थितीत ओरोस जैतापकर कॉलोनी येथे जिल्हा काँग्रेसची बैठक संपन्न झाली या बैठकीत मार्गदर्शन करताना कार्यक्रमाच्या रुपरेषा बाबत मा.खासदार हुसेन दलवाई आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजन भोसले यांनी माहिती दिली.

 


गुरुवारी २६ जानेवारी पासून हा कार्यक्रम संपुर्ण जिल्ह्यात राबविला जाणार आहे.
यावेळी बोलताना हुसेन दलवाई यांनी *हातसे हात जोडो* या पक्षाच्या अभियानाचा उद्देश विषद केला. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत *भारत जोडो* ही पदयात्रा काढली आहे. आज जे देशामध्ये द्वेषाचे वातावरण सत्ताधाऱ्यांमार्फत निर्माण केले जात आहे. धर्मा धर्मा मध्ये जाती जाती मध्ये भांडणे लावली जात आहेत. संवैधानिक संस्थांचा गैरवापर केला जात आहे. समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. देशासमोर असलेल्या मूळ समस्या महागाई, बेकारी,शेतकऱ्यांचे प्रश्न, तरुणांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न,रोजगाराचा प्रश्न, उद्योग बंद पडत आहेत. या सर्व समस्यांपासून जनतेचे लक्ष दूर नेण्यासाठी केंद्रात असलले सरकार देशाच्या एकतेला धोका निर्माण करणारे विषय काढत आहे म्हणून राहुल गांधी देशातील जनतेचा आवाज बनून *भारत जोडो* यात्रेत कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत पायी चालत आहेत व त्यांना जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
राहुल गांधी प्रेमाचा संदेश घेऊन आणि जनतेचे मूळ प्रश्न घेऊन ही पदयात्रा करत आहेत तोच राहुल गांधींचा उद्देश गावागावात पोहचवण्यासाठी *हातसे हात जोडो* अभियान राबविण्यात येत आहे. याची सुरवात 26 जानेवारीला झेंडावंदनाने करावी आणि पुढील दोन महिने प्रत्येक तालुक्यातील गावागावात हा उद्देश आणि संदेश पोहचवण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घ्यावेत. प्रत्येक घरापर्यंत पोहचण्याचा पर्यंत करावा असे आवाहन *हातसे हात जोडो* या अभियानाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निरीक्षक मा. खासदार हुसेन दलवाई यांनी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत कले.

या बैठकीला जिल्हा निरिक्षक हुसेन दलवाई, राजन भोसले, जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख, प्रदेश प्रतिनिधी साईनाथ चव्हाण, सुगंधा साटम, जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, सरचिटणीस अरविंद मोंडकर, प्रवीण वरूनकर, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष महेश उर्फ बाळू अंधारी, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, आनंद परुळेकर, देवानंद लुडबे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, समीर वंजारी, संदेश कोयंडे, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष केतनकुमार गावडे, गुलजार काझी, आनंद कुंभार, वसीम काझी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + ten =